Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

नंदिहळ्ळी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी मंत्री हेब्बाळकर यांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील नंदिहळ्ळी गावातील जागृत देवस्थान कलमेश्वर (शिव) मंदिर अत्यंत जुने मंदिर आहे .त्या मंदिराचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. तेव्हा धर्मादाय खात्यातून या मंदिरासाठी विशेष निधी मंजूर करावा यासाठी नंदिहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीने महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना सोमवार दि. 16 रोजी निवेदन देण्यात …

Read More »

बंगळूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणास राज्य सरकारच जबाबदार; भाजपचा गंभीर आरोप

    बेळगाव : बंगळूरमधील आरसीबी संघांच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत ११ जणांचा बळी गेलेल्या घटनेला राज्य काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत आज बेळगावात भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात हातात फलक घेऊन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी माजी आमदार संजय पाटील …

Read More »

मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतर्फे शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन….

  बेळगाव :  विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने शाळेतील एस एस एल सी 2025 वर्षात उत्तम गुण संपादन केलेल्या होतकरू विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा शिष्यवृत्तीचे वितरण तसेच विविध मान्यवरांच्या व शिक्षकांच्या कडून प्रोत्साहन पर देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण शनिवार दिनांक 14 जून रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख …

Read More »

हरीनामाच्या गजरात वडगावचे वारकरी आषाढी वारीसाठी मार्गस्थ…

  बेळगाव : विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आसुसलेले आहेत. बेळगाव आणि परिसरातूनही हजारोंच्या संख्येने वारकरी यावर्षीच्या वारीत सहभागी होत आहेत. आज रविवारी वडगाव राजवाडा कंपाउंड श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथून शेकडो हरीभक्त पंढरपूर मार्गे आळंदीला वारीत सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत. आषाढी वारीत आतापर्यंत …

Read More »

बॉडी बिल्डिंग अँड स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जीम ओनर्स असो. पदाधिकाऱ्यांचा सत्कार

  बेळगाव : जीमच्या माध्यमातून बेळगाव मधील युवक युवतीना व्यसनापासून दूर ठेवून त्यांची शरीरयष्टी घडवणे व्यायामपटू घडवणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज बेळगावत 120 हून अधिक जिम उभारणी केलेली आहे. कोणत्याही संघटनेने व्यायाम पटूना स्पर्धेत भाग घेण्यासाठी अडथळा आणू नये असे आम्ही आवाहन करीत आहोत असे उद्गार जिम …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या सी.बी.एस.ई. दहावीच्या गुणवंत वि‌द्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कून बेळगांव येथील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी व्यासपीठावर ज्योती सेंट्रल स्कूलचे संस्थापक माजी चेअरमन डॉ. पि.डी. काळे, ज्योती पि.यु. कॉलेजचे निवृत्त प्राचार्य आणि ज्योती सेंट्रल स्कूलचे एस्.एम्.सी. चेअरमन प्रोफेसर आर. के. पाटील, व्हाइस चेअरमन प्रोफेसर आर्.एस्. …

Read More »

एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न

  बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळ समर्थ नगर बेळगाव यांच्या वतीने संकष्टी निमित्त आपल्या लाडक्या बाप्पाचे पाद्य पुजन व पाठ पुजन मोठ्या भक्तीभावात संपन्न शनिवार दिनांक १४/६/२५ रोजी सायंकाळी ७ वाजता गल्लीतील जेष्ठ नागरिकांच्या वतीने पाद्य पुजन व पाठ पुजन करून महाआरती करण्यात आले. यावेळी सुहासिनी महिलांनी …

Read More »

माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या मालमत्तेची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  बेळगाव : अलिकडच्या काळात बनावट कागदपत्रे तयार करून इतरांच्या मालमत्ता, घरे आणि जमीन विकणाऱ्या लोकांचे एक नेटवर्क जिल्ह्यात सक्रियपणे कार्यरत आहे. आता बनावट कागदपत्रे तयार करून माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांच्या मालकीची मालमत्ता लुटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून इतरांच्या मालमत्ता विकण्याचे रॅकेट जिल्ह्यात …

Read More »

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात, 7 जणांचा मृत्यू

  नवी दिल्ली : डेहराडूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी गौरीकुंडजवळ कोसळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. “गौरीकुंडमध्ये बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात सहा जण होते. आम्ही या प्रकरणी अधिक माहितीची वाट पाहत आहोत,” असे उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले. त्यांनी …

Read More »

सीमाभागातील मराठी पत्रकारांच्या हितासंदर्भात चर्चा!

  बेळगाव : आज शनिवार दि. १४ रोजी बेळगाव मिडिया असोसिएशनची बैठक श्री शंभू जत्तीमठ येथे घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत काकतीकर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संघटनेच्या सदस्या अरुणा गोजे- पाटील यांचे सासरे प्रभाकर नारायण गोजे -पाटील त्याचबरोबर अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्या सर्वांना स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. …

Read More »