Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

आज पुन्हा कोसळला कपिलेश्वर विहिरीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग; विहिर परिसर सील

  बेळगाव : शहरातील कपिलेश्वर मंदिरामागील ऐतिहासिक विहिरीची अवस्था अतिशय धोकादायक बनली आहे. रविवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी पुन्हा विहिरीच्या संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला. सुदैवाने त्यावेळी परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने दुर्घटना टळली. रविवारी सकाळी शिवम आणि परशुराम ही पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पोहून झाल्यावर …

Read More »

विकास, सुरक्षा आणि समानतेसाठी जनतेने भाजपवर विश्वास ठेवला : किरण जाधव

  बेळगाव : पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकीय प्रवाहाची स्पष्ट दिशा दाखवली आहे, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्ववादी लाट स्पष्टपणे दिसून आल्याचे भाजप नेते किरण जाधव म्हणाले. याबाबत बोलताना ते म्हणाले की, एकूण निवडणुकीत लोकांनी विकास, सुरक्षा आणि समानतेसाठी मतदान केले. मात्र, केवळ पश्चिम बंगालमध्येच हिंदू समाजाला दिलेली पसंती …

Read More »

डॉ. विनोद गायकवाड द्वारा कामगारांचा सन्मान

  बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या मासिक बैठकीत ठरल्याप्रमाणे डॉ. विनोद गायकवाड सरांनी आपल्या वार्डातील 3 कामगारांचा कामगार दिनी सत्कार केला. सौ. पोर्णिमा, सौ. सविता राजू बागांची व श्री. प्रवीण वीर यांना शाल, गुलाबपुष्प व आणि प्रत्येकी पाचशे रुपयांचे मानधन देऊन सत्कार केला. याप्रसंगी प्रा. विनोद गायकवाड, सौ. …

Read More »

कपिलेश्वर तलावाच्या सुरक्षिततेसाठी युवा समिती सीमाभाग जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

  बेळगाव : कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या तलावात संरक्षक भिंत कोसळून दोन मुलांचा बळी गेला, या तलावाची पुनर्बाधणी करून प्रशासनाने सुरक्षितता वाढवावी, या मागणीसाठी व संदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा सीमाभाग व नागरिकांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 5 मे रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. तरी कपिलेश्वर …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांची 2017 च्या महामेळावा खटल्यातून निर्दोष मुक्तता

  बेळगाव : दिनांक 13 नोव्हेंबर 2017 रोजी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने व्हॅक्सिन डेपो येथे महामेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला त्याबद्दल रीतसर निवेदन देण्यात आले पण प्रशासनाने परवानगी  नाकारली. उलट दिनांक 12 नोव्हेंबर 2017 ते दिनांक 14 नोव्हेंबर 2017 रोजी बेळगाव शहरात कलम 144 …

Read More »

कडोली मराठी साहित्य संघाचा साहित्य सेवा पुरस्काराने सन्मान

  कडोली : येथील कडोली मराठी साहित्य संघाला चाळकवाडी (जि. पुणे ) येथील शिवांजली साहित्यपीठ संस्थेने ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्काराने गौरविले आहे. संघाच्या साहित्य क्षेत्रातील रचनात्मक कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. शिवांजली साहित्यपिठातर्फे 33 वा राज्यस्तरीय शिवांजली मराठी साहित्य महोत्सव -2026 ता. १ ते ३ मे दरम्यान …

Read More »

श्री दत्त पद्मनाभ पीठातर्फे उचगाव येथे ‘सामूहिक दिव्य उपनयन संस्कार’ सोहळा संपन्न

  बेळगाव : श्रीदत्त पद्मनाभ पीठाचे विद्यमान पीठाधीश्वर पद्मश्री विभूषित परमपूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या दिव्य कृपाशीर्वादाने रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी उचगाव (बेळगाव) येथे सामूहिक ‘दिव्य उपनयन संस्कार’ सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला. हा सोहळा श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी-गोवा तसेच स्वामी ब्रह्मानंद वैदिक …

Read More »

विधानसभा निवडणुकांत भाजपचा विजय; बेळगावात जल्लोष

  बेळगाव : पश्चिम बंगाल, आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या विजयाचा आनंद शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला, तर शहरातून भव्य बाईक रॅली काढत विजय साजरा केला. राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी या विजयाबद्दल समाधान व्यक्त करत मतदारांचे आभार मानले. पश्चिम …

Read More »

चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन उद्यापासून

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे ब्रम्हलिंग मंदिरचा तिसरा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. २०२३ रोजी साली नुतन मंदिरची वास्तू शांती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या होता. त्यानंतर ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार समितीने व ग्रामस्थांनी दरवर्षी मे महिन्यात दोन दिवस म्हणजेच चार आणी पाच या तारखेला वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा …

Read More »

जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजनाचा कार्यक्रम डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटर सोमवारपेठ टिळकवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष के एल मजूकर, कार्यवाह सुरेन्द्र देसाई व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते. यावेळी श्री. मजूकर यांनी कान्स्टंट टिनोपालचा पाडाव या ऐतिहासिक …

Read More »