Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

मनपा नगर नियोजन, सुधारणा स्थायी समितीची 21 रोजी बैठक

  बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या नगर नियोजन आणि सुधारणा स्थायी समितीची बैठक बुधवार दि. 21 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. सदर बैठकीच्या विषय पत्रिकेवर पुढील प्रमाणे विषय असणार आहे. 1) मागील गेल्या 28 मार्च 2025 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त वाचून त्याला मंजुरी …

Read More »

ग्रामीणचे पोलीस निरीक्षक हिरेमठ यांच्यावरील निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्या अन्यथा उग्र आंदोलन…

  बेळगाव : संतीबस्तवाड गावात कुराण विटंबनेप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्यामुळे निलंबित असलेले बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या समर्थनात आणि त्यांचे निलंबन मागे घ्यावे, या मागणीसाठी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी संघटितपणे राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन छेडून मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. राणी कित्तुर चन्नम्मा सर्कल …

Read More »

पायोनियर बँकेच्या मार्केट यार्ड शाखेचे उद्या उद्घाटन

  बेळगाव : 119 वर्षाची वाटचाल करीत असलेल्या येथील दि. पायोनियर अर्बन को-ऑप बँकेच्या नूतनीकरण केलेल्या मार्केट यार्ड शाखेचे उद्घाटन उद्या मंगळवार दि. 20 मे रोजी सकाळी 10.30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमास पाहुणे म्हणून मराठा जगद्गुरु वेदांताचार्य प पु श्री मंजुनाथ भारती स्वामीजी, भवानी पेठ बेंगलोर आणि परमपूज्य …

Read More »

जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त मातांचा सन्मान

  बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून महागणपती देवस्थान लक्ष्मी रोड येथे ५ माता शांता केदनूरकर, मनीषा मासेकर, लक्ष्मी केळवेकर, संगीता पाटील, सुमन पोटे यांचा शाल, श्रीफळ, मानचिन्ह, पुष्पगुच्छ, आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने मनीषा मासेकर यांनी सत्कार केल्याबद्दल जायंट्स ग्रुपचे आभार व्यक्त …

Read More »

अमन कॉलनीतील नवे काँक्रीट रस्ते, गटार बांधकामाचे उद्घाटन

  बेळगाव : स्थानिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकताना बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी काल शाहूनगरमधील अमन कॉलनीला भेट देऊन तेथील नवीन काँक्रीट रस्ते आणि गटारांच्या बांधकामाचे उद्घाटन केले. सदर नवीन काँक्रीट रस्ते आणि गटार बांधकाम प्रकल्प हा आमदारांच्या अलिकडच्या भेटीनंतर सुरू झाला …

Read More »

बेळगावात सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाचा ‘फिट इंडिया’चा संदेश

  बेळगाव : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाच्या वतीने ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत बेळगावात सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. बेळगावातील क्लब रोडवरील जीएसटी भवनापासून या सायकल मॅरेथॉनला बेळगाव आयुक्तालयाचे आयआरएस, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान आयुक्त समीर बजाज यांनी चालना दिली. ही सायकल रॅली राणी चन्नम्मा सर्कल, एम.जी. …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज केवळ ‘ग्रेट मराठा’ तर ‘ग्रेट इंडियन’ : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मराठा आणि मुस्लिम बांधव सख्ख्या भावांप्रमाणे एकत्र होते. आजच्या काळात आपण सत्यता विसरत चाललो आहोत. समाजाला खरा इतिहास सांगणारी पुस्तके लिहिली गेली पाहिजेत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. शहरातील कन्नड भवनात रविवारी डॉ. सरजू काटकर यांच्या ‘छत्रपती शिवाजी …

Read More »

हनुमान नगरवासियांनी घेतला ब्लॅकआउटचा अनुभव

  बेळगाव : बेळगाव मधील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या हनुमान नगर परिसरात आज रात्री आठ ते सव्वा आठ पर्यंत ब्लॅक आऊट करण्यात आले होते. तत्पूर्वी गाडीवरून सूचना देण्यात आल्या होत्या. घरामध्ये इन्व्हर्टर असलेल्यांना सुद्धा ते लावू नये यासाठी सूचना देण्यात आली होती. या ब्लॅकआउट बाबत लोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती. बरेच …

Read More »

सोशल मीडियावर कुराणबद्दल अपमानास्पद टिपणी; शहापूर पोलिस ठाण्यास मुस्लिम तरुणांचा घेराव!

  बेळगाव : सोशल मीडियावर कुराणबद्दल अपमानास्पद टिपणी केल्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर पोलिस ठाण्याला हजारो मुस्लिम तरुणांनी घेराव घातला. व त्यांच्या अटकेची मागणी करत निदर्शने केली. आरोपीला अटक होईपर्यंत येथून हलणार नाहीत असा मुस्लिम तरुणांचा आग्रह होता. दरम्यान, डीसीपी रोहन जगदीश यांनी शहापूर पोलिस ठाण्यास भेट देऊन निदर्शने करणाऱ्या मुस्लिम तरुणांची …

Read More »

उद्या विविध भागांत वीजपुरवठा खंडित

  बेळगाव : कर्नाटक वीज प्रसारण निगम लिमिटेड (केपीटीसीएल) च्या वतीने 110 के.व्ही. वडगाव उपकेंद्रामध्ये चौथ्या त्रैमासिक व आपत्कालीन देखभालीची कामे हाती घेण्यात येत असल्याने उद्या रविवार दिनांक 18 मे रोजी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9.00 वाजेपासून संध्याकाळी 4.00 वाजेपर्यंत वडगाव उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा होणाऱ्या धामणे, कुरबरहट्टी, …

Read More »