Thursday , June 4 2026
Breaking News

नगरसेवक अपात्रता प्रकरणी “तारीख पे तारीख”; 4 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील बहुचर्चित खाऊकट्टा प्रकरणासंदर्भात महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आत्ता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. सरकारच्या वतीने ऍडव्होकेट जनरल हे या सुनावणीला उपस्थित राहणार होते मात्र काही कारणास्तव ते अनुपस्थित राहिल्याने सदर सुनावणी 4 ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव प्रादेशिक आयुक्त, महापौर मंगेश पवार व नगरसेवक जयंत जाधव यांना आणखीन एक नोटीस बजावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये सीबीआयची चौकशी; आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची पडताळणी

Spread the love  बेळगाव : देशातील सहा राष्ट्रीय मिलिटरी स्कूलपैकी एक असलेल्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *