बेळगाव : अखिल लिंगायत नुरू कयक पंगड महासंघाच्या राज्य आणि बेळगाव जिल्हा युनिटचे शानदार उद्घाटन नुकतेच पार पडले. शहरातील कन्नड भवन येथे बुधवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात कारंजीमठाचे श्रीगुरुसिद्ध महास्वामीजी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष अरविंद परवशेेट्टी, संस्थापक …
Read More »फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या कार्यकर्त्यांनी केली बेघर व्यक्तीला मदत
बेळगाव : बेळगावातील टिळकवाडी येथील सेंट्रल केअर हॉस्पिटलसमोर रेल्वे गेटजवळ फूटपाथवर बेघर आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीला फेसबुक फ्रेंड्स सर्कलने मदतीचा हात पुढे केला. या व्यक्तीची दयनीय अवस्था पाहून फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी त्वरित टिळकवाडी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी आणि …
Read More »खोटी बातमी पसरवणाऱ्या अनिस उद्दीन विरोधात गुन्हा दाखल
पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांची माहिती बेळगाव : कर्नल सोफिया कुरेशी यांच्या घरावर आरएसएस आणि हिंदू संघटनांनी हल्ला करून तोडफोड केली, अशी खोटी बातमी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अनिस उद्दीन नावाच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आज पत्रकार परिषदेत …
Read More »श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे बेळगांवात “उपनयन संस्कार” समारंभ
बेळगांव : हिंदू धर्म संस्कृतीचे संरक्षण होण्यासाठी आपल्या मुलांवर उत्तम संस्कार होणे आवश्यक आहेत. मुलांची तेजस्विता वाढविण्यासाठी व वैदिक संस्कारांचा वारसा घरोघरी सुरू ठेवणे काळाची गरज असून सर्वांनी हिंदू म्हणून एकत्रित झाले पाहिजे. भविष्यात समस्त हिंदूधर्मियांनी मोठ्यासंख्येने आपल्या पाल्यांवर उपनयन संस्कार करून देश बलवान करण्यासाठी समर्पित व्हावे. कारण धर्म …
Read More »कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलेल्या मंत्र्याविरुद्ध बेळगावतही एफआयआर दाखल
बेळगाव : ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तरादरम्यान पत्रकार परिषदेत लष्करी माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मध्य प्रदेशचे मंत्री आणि भाजप नेते विजय शाह यांच्याविरुद्ध बेळगावमध्येही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एसपी भीमाशंकर गुळेद यांच्या सूचनेवरून बेळगावातील सीएनएन पोलिस ठाण्यात भाजप नेते विजय शाह यांच्याविरुद्ध …
Read More »बेळगावात मराठा जगदगुरू श्री मंजूनाथ स्वामीजींच्या सान्निध्यात भक्तीमय संध्या संपन्न
बेळगाव : बेळगावातील वडगाव येथील पटवर्धन ले-आऊट गार्डनमध्ये आज दुपारी एक अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि भक्तीमय कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मराठा समाजाचे आधारस्तंभ, परमपूज्य मराठा जगदगुरू वेदांताचार्य श्री श्री श्री मंजूनाथ भारती महास्वामीजी यांची पावन उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. गोपाळ बिर्जे, वर्षा बिर्जे, …
Read More »सपार गल्ली, तेग्गीन गल्ली येथील ड्रेनेजचे काम थांबवल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा
बेळगाव : वडगाव येथील सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली येथील ड्रेनेजचे काम थांबवल्याच्या महापालिकेच्या निर्णयाचा निषेध करत गुरुवारी सपार गल्ली आणि तेग्गीन गल्ली रहिवाशांनी निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ज्यामध्ये चौडेश्वर गल्लीच्या एका भागात महापालिकेने ड्रेनेजचे काम अपूर्ण ठेवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नाल्यात कचरा साचत आहे, …
Read More »विनोद गायकवाड यांना दमसाचा महादेव मोरे पुरस्कार
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा (दमासा) कोल्हापूर यांच्या वतीने 2024 चे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. त्यामध्ये बेळगाव येथील साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड यांच्या “युगांत” कादंबरीला कै. महादेव मोरे पुरस्कार जाहीर झाला आहे. सीमा भागातील या ज्येष्ठ लेखकाच्या नावाचा पुरस्कार सीमाभागातीलच दुसऱ्या साहित्यिकाला मिळतो हा सुंदर योगायोग …
Read More »तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्ह्यात मॉक ड्रील : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी चिक्कोडी व बेळगाव येथे लवकरच मॉक ड्रीलचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. बुधवारी (१४ मे) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी …
Read More »तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने आदर्श माता सन्मान सोहळा शनिवारी
बेळगाव : तारांगण, रोटरी क्लब व जननी ट्रस्टच्या वतीने मातृदिना निमित्त आदर्श माता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक 17 मे 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता सरस्वती वाचनालयाच्या डॉ.शकुंतला गिजरे सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक रोटरीक्लब ऑफ बेळगाव इलाईट, जननी ट्रस्ट हे आहेत. ज्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta