Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटली: दोन जण गंभीर जखमी

  बेळगाव : केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी धावत्या कारवर उलटल्याने कारमधील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी केएलई हॉस्पिटलजवळील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या संपर्क रस्त्यावर काँक्रीट मिक्सर लॉरी केए-25 एमडी 6506 क्रमांकाच्या कारवर उलटली. या अपघातात बागलकोट …

Read More »

हुलबत्ते कॉलनीत जल्लोषात रंगोत्सव…

  बेळगाव : रंगांची बेभान उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली चिमुकली मुले, महिला वर्ग, आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, डीजेवरील ठेक्यावर मनमुरादपणे चिंब झालेल्या मैत्रिणी तसेच युवतींचा उत्साह आणि सप्तरंगाची उधळण करत शुक्रवारी (दि. १४) शहरातील हुलबत्ते कॉलनीत रंगोत्सव …

Read More »

स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी मेहनत करा : रणजीत चौगुले

  मार्कंडेय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बेळगाव : स्वप्न नेहमी मोठी पाहा, पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेवा. प्रत्येक अडचण ही नव्या संधीची सुरुवात असते. मेहनत, सातत्य आणि सकारात्मक विचारसरणी या त्रिसूत्रीने तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल असे उदगार सरदार्स हायस्कूलचे शिक्षक रणजीत चौगुले यांनी काढले. मार्कंडेय हायस्कूल, मार्केट यार्ड …

Read More »

जायंट्स मेनची रंगपंचमी यावर्षीही माहेश्वरी अंध शाळेतच; अंध विद्यार्थ्यासमवेत साजरा केला होळी सण

    बेळगाव : अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर सर्कल येथील माहेश्वरी अंध शाळेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपुर्ण बेळगावात सर्वच जण या उत्सवाचा आनंद घेतात, पण ज्यांनी हे जगच पहिले नाही, अशा विद्यार्थ्यासमवेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीची माहेश्वरी अंधशाळेत रंगपंचमी साजरी करीत आहोत, असे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील …

Read More »

बेळगावात रंगोत्सव अपूर्व जल्लोषात साजरा

    बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोड, सीपीएड मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. …

Read More »

संस्कृती संवर्धनाबरोबरच जनजागृतीचे कार्य हाती घ्यावे

  माधूरी सावंत – भोसले; ‘मराठा संस्कृती संवर्धन’चा वर्धापन दिन उत्साहात बेळगाव : मराठा संस्कृती संवर्धन संघटनेने संस्कृतीच्या संवर्धनासाठी आजवर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. संघटनेने आता सामाजिक आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी जनजागृतीचे कार्यही हाती घ्यावे, असे आवाहन उत्साळी (ता. चंदगड) ग्राम पंचायतीच्या माजी सरपंच व पूणे येथील यशवंतराव विकास प्रबोधनीच्या …

Read More »

मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी

  बेळगाव : बेळगावातील मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटर मध्ये पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्धरित्या होळी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या होळी कार्यक्रमाला अधिकारी, जवान आणि प्रशिक्षणार्थी जवान उपस्थित होते. मराठा लाईट इन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते होळीचे पूजन करण्यात आले. रांगोळी काढून होळीची …

Read More »

खडे बाजार येथील थळ देव मंदिरासमोर कचऱ्याचे साम्राज्य; कचरा टाकणाऱ्यावर कारवाईची मागणी

  बेळगाव : खडे बाजार येथील मंदिराच्या आवारात रिकाम्या दारूच्या बाटल्या आणि मास मटणाचे तुकडे टाकले जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला जात आहे. बेळगाव खडे बाजारमधील थळ देव मंदिरासमोर घाण कचरा टाकला जात आहे. येथे पडणार कचरा पाहिल्यास काहीनी या परिसराला कचरा कुंडीचे …

Read More »

पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर पलटी

  बेळगाव : पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या अपघातात कंटेनर पलटी होऊन शेजारी सर्व्हिस रोडवर जाऊन पडल्याची घटना आज गुरुवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हालगा येथील धाब्या समोर घडली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एक मोठा कंटेनर (क्र. …

Read More »

“त्या” नगरसेवकाविरोधात बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची निदर्शने

  बेळगाव : काँग्रेसच्या एका नगरसेवकाकडून महापालिका अधिकाऱ्याचा सतत छळ होत असून नगरसेवकाने अधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप करीत बेळगाव महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडून मूक निदर्शन केली. बेळगाव महानगरपालिकेचा तो नगरसेवक अधिकाऱ्यांबरोबर बोलताना अर्वाच्च शब्दांचा वापर करतो. शिवाय मानसिक छळ करून वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या …

Read More »