Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूरची स्थापना

  मण्णूर : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे कलमेश्वर हायस्कूल, मण्णूर येथे “इंटरॅक्ट क्लब ऑफ मण्णूर” या नवीन इंटरॅक्ट क्लबचा स्थापना समारंभ डीजी आरटीएन शरद पै यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी अधिष्ठाता अधिकारी आरटीएन ॲड. महेश बेल्लद उपस्थित होते. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे अध्यक्षा प्रीती चौगुले यांना …

Read More »

नाल्याचे बांधकाम तात्काळ थांबवा; पालकमंत्री सतीश जारकीहोळींनी दिला संबंधित अधिकाऱ्यांना आदेश

  बेळगाव : आनंदनगर येथील नाला वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नागरिकांना विश्वासात न घेता स्थानिक लोक्रतिनिधींनी तसेच पालिका प्रशासनाने आनंदनगर वडगांव येथील नाल्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी येथील नागरिकांच्या घरावर आरेखन देखील करण्यात आले असून काही जणांच्या घरावर आणि संरक्षण भिंतीवर हातोडा देखील पडला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोन …

Read More »

डॉ. हर्षा अष्टेकर आणि रोशनी मुळीक यांचा जायंट्स मेनतर्फे सत्कार

  बेळगाव : कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादित केलेल्या डॉ. हर्षा अष्टेकर आणि रोशनी मुळीक यांचा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनतर्फे यथोचित सन्मान करण्यात आला. डॉ. हर्षा अष्टेकर यांचे शालेय शिक्षण मराठीतून होऊनसुद्धा त्यांनी फार्मसीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून मंगळूर येथील निट्टे विद्यापीठातुन डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. …

Read More »

बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून चेतनसिंग राठोड यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या चेतनसिंग राठोड याना निर्गमित आयजीपी विकासकुमार विकास यांनी पदभार सोपवला. बेळगाव उत्तर विभागाचे आयजीपी विकासकुमार विकास यांची अन्यत्र बदली झाल्यानंतर चेतनसिंग राठोड यांनी बेळगाव उत्तर विभागाचे नवे आयजीपी म्हणून पदभार स्वीकारला. निर्गमित आयजीपी विकासकुमार विकास यांनी त्यांना अधिकारपदाची सूत्रे …

Read More »

डॉ. हर्षा अष्टेकर यांना पीएचडी प्रदान

  बेळगाव : येथील सदाशिवनगर येथील रहिवासी डॉ. हर्षा अष्टेकर यांना मंगळुरू निट्टे विद्यापीठाकडून फार्माकोलॉजीमध्ये पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. पार्किन्सन्स रोगाच्या उपचारात पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह्जचे डिझाइन डेव्हलपमेंट हा वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी निवडला होता. डॉ. हर्षा यांचे शालेय शिक्षण महिला विद्यालय मराठी माध्यमातून झाले असून मराठा मंडळ फार्मसी कॉलेजमधून पदवी आणि …

Read More »

पायोनियर बँकेचा उत्कृष्ट बँक म्हणून गौरव

  बेळगाव : येथील पायोनियर अर्बन सहकारी बँकेला सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट बँक हा पुरस्कार बहाल करण्यात आला. बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा बँकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी बेळगाव जिल्ह्यातील 28 बँकापैकी पाच बँकांना वेगवेगळ्या कॅटेगिरीमध्ये उत्कृष्ट बँकेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. …

Read More »

घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू

  बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील बेनकोळी गावाजवळ घटप्रभा नदीत कार कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हुक्केरी तालुक्यातील दड्डी गावातील किरण नावाच्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला आहे. मारुती इक्कोने किरण प्रवास करत असताना कार घटप्रभा नदीत कोसळली. यमकनममर्डीहून बेळगावच्या दिशेने जात असताना कार नदीच्या पाण्यात पडली. कारमध्ये अडकून किरणचा …

Read More »

अखेर सुळगा-देसूर रस्त्याला सुरुवात; गोविंद टक्केकरांचा पाठपुरावा

  बेळगाव : दक्षिण भागातील महत्त्वाचा असलेल्या सुळगा-देसूर रस्त्याची दुर्दशा झाली होती. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते गोविंद टक्केकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. अखेर या रस्त्याचे काम सुरु झाल्याने परिसरातील ग्रामस्थातून समाधान व्यक्त होत आहे. सुळगा-देसूर रस्त्याची पावसाळ्यात दूरवस्था झाली होती. दुचाकी व …

Read More »

श्री अय्यप्पा सेवा समिती आयोजित 53 वा अय्यप्पा पूजा महोत्सव संपन्न

  बेळगाव : आश्रय कॉलनी नानावाडी येथे श्री अय्यप्पा सेवा समिती ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला 53 वार्षिक श्री अय्यप्पा पूजा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. या महोत्सवाअंतर्गत दि. 22 रोजी ध्वजारोहण झाले. दि.22 ते 27 डिसेंबर पर्यंत रोज पूजा, विशेष पूजा, खास पूजा आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच तालपोली मिरवणूक, …

Read More »

कंग्राळ गल्लीत विविध स्पर्धांचे आयोजन

  बेळगाव : कंग्राळ गल्ली वेताळ देवस्थानच्या यात्रेनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लहान मुले, मुली व महिला यांनी भाग घेतला. या स्पर्धेचे आयोजन गल्लीतील युवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने राबविली होती. लिंबू चमचा, बटाटा, संगीत खुर्ची, करेला अशा अनेक स्पर्धा भरविण्यात आल्या. या स्पर्धेचे प्रायोजक एस. पी. कार ॲक्सेसरीजचे …

Read More »