महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात साजरा बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा दिन सोहळा अपूर्व उत्साहात मराठा मंदिर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून श्री. आकाश शंकर चौगुले आय आर एस …
Read More »सांबरा येथे एटीएम फोडून लुटीच्या प्रकाराने खळबळ
बेळगाव : सांबरा येथे चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून मोठी रक्कम लांबविली असल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एकूण किती रक्कम चोरीस गेली याबाबतची चौकशी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आणखी काही ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट …
Read More »डॉ. शरद बाविस्कर यांचे बेळगावमध्ये आगमन; साठे प्रबोधिनी आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार
बेळगाव : जे.एन.यू विद्यापीठाचे प्राध्यापक, फ्रेंच भाषेचे अभ्यासक, साहित्यिक व विचारवंत डॉ. शरद बाविस्कर गुरुवर्य वि.गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आज बेळगावमध्ये दाखल झाले. सांबरा विमानतळावर प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतनचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्रबोधिनीचे सदस्य …
Read More »संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात कौटुंबिक वातावरण : मंगला मठद
संजीवीनी फौंडेशनचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न बेळगाव : बेळगाव आणि परिसरातील मी अनेक संस्थाना भेटी दिल्या आहेत पण संजीवीनी काळजी केंद्रात एक कौटुंबिक वातावरण पहायला मिळते, इथे प्रत्येक सणवार मोठया प्रमाणात साजरे केले जातात. आज काळजी केंद्रात वास्तव्यास असलेले सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित फॅमिली गेटटूगेदर ही संकल्पनाही नविन वाटल्याचे …
Read More »मराठा मंडळ फार्मासी महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
बेळगाव : येथील मराठा मंडळ फार्मासी महाविद्यालयात २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णु कंग्राळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खोखो, क्रिकेट, थ्रोबॉल, हॉलीबॉल, रनिंग 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाच्या शिष्टमंडळाने घेतली शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके आणि सहकाऱ्यांनी घेतली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी भेट. बाळेकुंद्री येथे अल्पवयीन मुलीला केलेल्या शिवीगाळ प्रकरणाला भाषिक रंग देऊन सीमाभागात वातावरण खराब करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या दबावाखाली येऊन. उलट अमच्यावरच …
Read More »रुद्रा जीमच्या ऋतिक पाटील, महेश गवळी यांचे स्पृहणीय यश
बेळगाव : हिंडलगा येथील रुद्रा जीम या व्यायाम शाळेचे शरीर सौष्ठवपटू ऋतिक पाटील आणि महेश गवळी यांनी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या मि. एशिया -2025 या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत स्पृहणीय यश मिळविले आहे. युनायटेड इंटर कॉन्टिनेन्टल बॉडी बिल्डिंग फिटनेस फेडरेशन (युआयबीबीएफ) संस्थेच्यावतीने आयोजित उपरोक्त स्पर्धा गेल्या रविवारी 16 …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गृह भेटी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी गृह भेटी देण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. अभ्यास कसा करावा? अभ्यासाचे महत्त्व शिक्षकांनी गृह भेटीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच बालक व पालक यांच्या अडचणी समजून घेतल्या. येणाऱ्या वार्षिक परीक्षेसाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे? याविषयी मार्गदर्शन केले, घरी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासपूर्वक …
Read More »महाराष्ट्र – कर्नाटक राज्यांमधील बस वाहतूक पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा
बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांची समन्वय बैठक बेळगाव : कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमधील बस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बेळगाव-कोल्हापूर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार सोमवारी (25 फेब्रुवारी) आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंग समन्वय बैठकीत बोलताना बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, राज्य परिवहन …
Read More »महात्मा गांधी संस्थेतर्फे कथा, लेखन मार्गदर्शन शिबिर
कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे कथा, लेखन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक २ मार्चला बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी येथे सकाळी १०.३० कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शंकर चौगले उपस्थित रहाणार आहेत साहित्य लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणतं कौशल्य विकसित करावे त्याचं मार्गदर्शन तासगावचे साहित्यिक रवि राजमाने करणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta