Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव

5 मार्च रोजी ‘आमचे पाणी, आमचा हक्क’साठी भव्य मोर्चा

  बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा त्याला जाऊ नये आणि त्यासाठी हाती घेण्यात आलेले जलवाहिनी घालण्याचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी येत्या दि. 5 मार्च 2025 रोजी बेळगाव शहरातील संघ -संस्था, संघटना आणि समस्त नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवण्याचा …

Read More »

प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या अध्यक्षपदी माधुरी पाटील तर उपाध्यक्षपदी सुरेखा सायनेकर यांची निवड

  येळ्ळूर : येळ्ळूर येथील प्रियदर्शिनी नवहिंद महिला सोसायटीच्या अध्यक्षपदी माधुरी पाटील यांची तर उपाध्यक्षपदी सुरेखा सायनेकर यांची एकमताने पुढील पाच वर्षासाठी निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून डेप्युटी रजिस्ट्रॉर रवींद्र पाटील यांनी काम पाहिले. तर संचालिका म्हणून वैशाली मजुकर, नम्रता पाटील, रेखा हणमंत पाटील, रेखा पाटील, राजश्री दणकारे, पूजा …

Read More »

मराठी प्राथमिक शाळा नं. 5 शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा

  बेळगाव : दिनांक 17/02/2025 सोमवार रोजी शाळा नं 5 चवाट गल्ली येथे विध्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन व माजी विद्यार्थी संघातर्फे आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आजच्या कार्यक्रमाला या शाळेचे माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर सर अध्यक्ष होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक वाचनालयाचे …

Read More »

येळ्ळूरमधील विविध संघटनांच्या वतीने राजकुंवर पावले यांचा सत्कार

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या व भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजकुंवर तानाजी पावले यांची बेळगाव दक्षिण भाजपा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, येळ्ळूर गावामधील विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकामध्ये प्रा. सी. एम. गोरल यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. त्यानंतर नेताजी युवा संघटना, येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य …

Read More »

पहिली-नववीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

  बेळगाव : पहिली ते सातवीपर्यंतच्या परीक्षा दि. 18 मार्चपासून सुरु होणार आहेत. तर आठवी व नववीच्या परीक्षा 5 मार्चपासून घेण्याचा निर्णय जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आला आहे. सोमवारी शालांत परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. बारावीची परीक्षा 1 मार्चपासून सुरु होणार आहे तर दहावीच्या परीक्षेला 21 मार्चपासून …

Read More »

मंदिरांना सरकारपासून मुक्त करा

  बेळगाव : हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी सरकारने आपल्या अस्तित्वातील मंदिरे मुक्त करावीत. प्रत्येक कुटुंबात तीन मुलांना जन्म देऊन हिंदू समाजाची लोकसंख्या वाढवणे आवश्यक आहे असे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे राष्ट्रीय प्रवक्ते नीरज डोनेरिया म्हणाले. ते आज बेळगाव शहरामध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारने देशातील मंदिरे धर्मदायी …

Read More »

राज्यातील ९ विद्यापीठे बंद करण्याचा सरकारचा निर्णय; अभाविपची निदर्शने

  बेळगाव : राज्यातील ०९ विद्यापीठे बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध करत आज बेळगावीतील राणी चेन्नम्मा सर्कल येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निदर्शने केली. विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन येणारे विद्यार्थी देशाच्या विकासात योगदान देतात. विद्यापीठांना आवश्यक संसाधने पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या न देत विद्यापीठांना बंद …

Read More »

जायंटसतर्फे अंधशाळेसाठी ब्लूटूथ साउंड बॉक्स आणि माईकची देणगी

  बेळगाव : जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीने मंगळवार दिनांक 18.2.2025 रोजी विजय नगर बेळगाव येथील समृद्ध फाउंडेशन संचलित अंधशाळेंच्या मुलांकरता अन ते चालवीत असलेल्या ऑर्केस्ट्रा करिता सहाय्य म्हणून एक ब्लूटूथ साऊंड बॉक्स आणि दोन माईक ही उपयोगी उपकरणे देणगी दाखल स्वरूपात जायंटस ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या …

Read More »

अभिजात मराठी संस्था आयोजित दोन दिवशीय आनंद मेळावा बेळगावात; सर्व मराठी संस्थांना आवाहन

  बेळगाव : मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम व भाषा विषयक इतर उपक्रम राबविण्यासाठी अभिजात मराठी संस्था, बेळगाव या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून दोन दिवशीय सांस्कृतिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. मराठा मंदिर, बेळगाव येथे गुरुवार दि. 27 व शुक्रवार दि. 28 …

Read More »

मिरज माहेर मंडळाची मासिक बैठकीत आरोग्य विषयक चर्चा संपन्न

  बेळगाव : मिरज माहेर मंडळाची फेब्रुवारीची मासिक बैठक विप्र वैभव, आदर्श नगर येथे स्मिता सरवीर यांच्या निवासस्थानी पार पडली. आयुर्वेदिक डाॅ. कौमुदी पाटील यांचे साठीनंतर महिलांनी आपली काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदिक उपचार कसे करुन घ्यावेत या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी खजिनदार सुखद देशपांडे यांनी मिरज माहेर …

Read More »