Sunday , December 21 2025
Breaking News

बेळगाव

बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यावरील पैसे लाटले; दोघांवर गुन्हा दाखल

  बेळगाव : बनावट कागदपत्रे तयार करून धनादेश आणि डीडीच्या माध्यमातून खादरवाडी येथील दोघांच्या खात्यावरील 17 लाख 46 हजाराची रक्कम काढून घेतल्याचे प्रकरण उघडकीस नुकतेच आले आहे. याबाबत 18 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल परशराम धामणेकर आणि बँक मॅनेजर कणबरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण हे …

Read More »

विदेशी पर्यटकांची राजहंसगड किल्ल्यावर दुर्गभ्रमंती

  बेळगाव : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या राजहंसगड किल्ल्यावर आज शनिवार दि. 19 रोजी ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन पाहायला मिळाले. साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्याला भेट दिली. गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर जाताना विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी पायातील बूट व चप्पल काढून …

Read More »

कळसा भांडुरी नाला जोडणी निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

  बेळगाव : कळसा भांडुरी नाला जोडणी प्रकल्पासंदर्भात काल कळसा भांडुरी नाला जोडणी महिला आंदोलनात महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती त्रिवेणी पटाथ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांना शुक्रवारी निवेदन दिले होते. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी कळसा भांडुरी आंदोलनाच्या महिला गटाने केलेली होती. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी …

Read More »

श्री महांतेश कवठगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमीत, बेळगाव शहापूर शाखेचा उदघाटन सोहळा २४ रोजी

  बेळगाव : श्री महांतेश कवठगीमठ सौहार्द सहकारी संघ नियमीत, बेळगाव शहापूर शाखेचा उदघाटन सोहळा गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ दुपारी ३.३० वाजता सरकारी चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालय, शहापूर, बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. शाखेचे उदघाटन बेळगाव दक्षिणचे आमदारश्री. अभय पाटील यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून बेळगावच्या महापौर …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची सोमवारी बैठक

  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात चर्चा करण्यासाठी बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे सोमवार दिनांक २१ रोजी दुपारी ठीक ५.०० वाजता बोलावण्यात आली आहे. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हौसूर आताच्या कर्नाटक राज्यात …

Read More »

हिवाळी अधिवेशन कोणत्या नैतिक अधिकाराने भरविणार : राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांचा सवाल

  बेळगाव : बेळगाव हिवाळी अधिवेशन घेण्याच्या तयारीत असलेल्या सरकारची कोणती नैतिकता आहे. मुडा प्रकरणात सीएम सिद्धरामय्या आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे, यावरून जनता सवाल उपस्थित करत आहे.. त्यांना कोणत्या तोंडाने उत्तर देणार? असा सवाल राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी उपस्थित केला. शनिवारी बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

बेळगावात राज्यस्तरीय रेड रिबन मॅरेथॉन उत्साहात

  बेळगाव : एड्स जनजागृती आणि निर्मूलनासाठी युवा जनोत्सवाचा एक भाग म्हणून आज बेळगावात राज्यस्तरीय रेड रिबन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक संस्था बंगलोर, जिल्हा विधी सेवा अधिकारी, जिल्हा पोलीस विभाग, युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग, माहिती व प्रसिद्धी विभाग, जिल्हा एड्स …

Read More »

खासदार जगदीश शेट्टर यांनी केला विविध भागाचा पाहणी दौरा

  बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शनिमंदिर, ताशीलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील मळा या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी या भागातील लोकांशी चर्चा करून अडीअडचणी जाणून घेतल्या. पाहणी दौऱ्याला सुरुवात करण्याआधी खासदार शेट्टर यांनी शनिमंदिरात जाऊन शनी महाराजांचे दर्शन घेतले. पूजा-आरती झाल्यानंतर ‘जनहित साधण्याची शक्ती दे, सर्वांवर …

Read More »

अवैधरित्या वाहतूक होणारी २.७३ कोटी रुपये जप्त

  बेळगाव : बेळगाव माळमारुती पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करून महाराष्ट्रातील सांगली ते हुबळी येथे मालवाहू वाहनातून अवैधरित्या वाहतूक केलेली २.७३ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. सचिन मेनकुदळे, सांगली, महाराष्ट्र आणि मारुती मरगुडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे …

Read More »

उद्योजक गोविंद टक्केकर यांच्याकडून देसूर गावात पाणी पुरवठा

  बेळगाव : पाणी टंचाईची समस्या उद्भवल्याने देसूर (ता. जि. बेळगाव) गावच्या मदतीला उद्योजक गोविंद टक्केकर धाऊन गेले असून त्यांनी गावात टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठ्याचे स्तुत्य कार्य सुरू केले आहे. पावसाळ्याचे दिवस अद्याप समाप्त झालेले नसताना बेळगाव तालुक्यातील देसूर गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा बेळगाव तालुक्यात पावसाने …

Read More »