बेळगाव : बळ्ळारी नाल्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी येथील स्थानिक शेतकऱ्यांना दिला. दरवर्षी बळ्ळारी नाल्याला पावसाळ्यात पूर येतो व शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत तर नाहीच समस्यांवर कायमस्वरूपी तोडगाही काढता येत नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी बळ्ळारी …
Read More »बिम्स हॉस्पिटलकडून चुकीचे प्रमाणपत्र दिल्याची तक्रार
बेळगाव : आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणात पोलीस यंत्रणेला चुकीचे प्रमाणपत्र देण्याची कामगिरी बिम्स हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची तक्रार बेळगुंदी येथील समिती कार्यकर्ते शटूप्पा चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले आहे. तसेच सदर निवेदन प्रांताधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्याकडे सुपूर्द केले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे …
Read More »“महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर
बेळगाव : महात्मा गांधी विचार मंच, गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) यांच्या वतीने यंदाचा पहिला “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता मराठी विद्यानिकेत येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, …
Read More »साखर कारखाना संचालकाच्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ बेळगाव- चंदगडवासीय रस्त्यावर!
बेळगाव : तिलारी धरणाचे पाणी कालव्याने मार्कंडेय नदीला जोडण्याच्या प्रकल्पासंदर्भात चंदगडचे आमदार राजेश पाटील आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्यात नुकतीच एक सकारात्मक औपचारिक बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सोयीस्कर राजकारण करत चंदगड येथील दौलत साखर कारखान्याचे संचालक मानसिंग खोराटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सीमावासीयांच्या भावना दुखावल्या …
Read More »गोकाक महालक्ष्मी सहकारी बँक घोटाळ्यातील 14 आरोपींची मालमत्ता जप्त : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : गोकाक महालक्ष्मी सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 14 आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत सदर माहिती दिली. दोन दिवसांपूर्वी महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष जितेंद्र यांनी तक्रार केली होती. बँकेच्या कर्मचाऱ्यांसह 14 आरोपींनी …
Read More »विद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय हँडबॉल व स्पर्धेला रविवार दि. 22 रोजी प्रारंभ झाला या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, संत …
Read More »मराठी शाळा नं. 5 चव्हाट गल्ली येथे माजी विद्यार्थी संघ आयोजित कै.ॲड. किसनराव यळ्ळूरकर गुणवत्ता पुरस्काराचे वितरण
बेळगाव : शनिवार दिनांक 21/9/2024 रोजी मराठी शाळा नं.5 चव्हाट गल्ली येथे कै. ॲड. किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर, ॲड अमर यळ्ळूरकर, चंद्रकांत बेळगावकर, शितल यळ्ळूरकर, प्रवीण जाधव, चारुदत्त केरकर, अमृत जाधव, श्रीकांत …
Read More »सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
बेळगाव : येळ्ळूर ता. बेळगांव येथील सन्मित्र मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या संस्थेची बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाल शिवाजी वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच खेळीमेळीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे संस्थापक वाय. सी. गोरल सर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून युनियन बँक येळ्ळूरचे शाखाप्रमुख अभिजीत सायमोते हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व …
Read More »विद्याभारती क्षेत्रीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धेला रविवार दि. 22 रोजी प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी, संत मीरा …
Read More »सेंट झेवियर्स मुलींच्या फुटबॉल संघाला अजिंक्यपद
बेळगाव : विजापूर जिल्हा सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित बेळगाव विभागीय प्राथमिक आंतरशालेय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट झेवियर्स मुलींच्या फुटबॉल संघाने पटकाविले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी जिल्हा संघावर 3-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta