Sunday , July 26 2026
Breaking News

पंत बाळेकुंद्री येथील जवान जम्मू काश्मीर अपघातात शहीद

Spread the love

 

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. या अपघातात बेळगाव तालुक्यातील पंत बाळेकुंद्री येथील रहिवासी असणारा दयानंद तिरकण्णवर हा जवान शहीद झाला आहे, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. दयानंद हे सांबरा या गावचे जावई आहेत. सदर घटनेचे वृत्त हाती येताच पंत बाळेकुंद्री आणि सांबरा गावावर शोककळा पसरली आहे. दयानंद यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

अपघाताची माहिती अशी की, जम्मू जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. पण, उपचारादरम्यान 5 जवानांची प्राणज्योत मालवली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *