बेळगाव : थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या कोळशाच्या शेकोटीमुळे तिघांचा श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बेळगाव शहरातील अमन नगर येथे घडली आहे. अमन नगर भागात एका खोलीत चार भावंडे वास्तव्यास होती. सध्या बेळगावात थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी खोलीमध्ये कोळशाची शेगडी पेटवण्यात आली होती. रात्री झोपताना …
Read More »काळविट मृत्यू प्रकरण; भूतरामहट्टीसह परिसरातील गावांना खबरदारी घेण्याची सूचना
बेळगाव : राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील एकापाठोपाठ एक 31 काळविटांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. 13 नोव्हेंबरपासून प्राणी संग्रहालयातील काळवीट एका पाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्याची घटना घडत होती. मृत काळविटांच्या मृतदेहाची तपासणी करून सादर केलेल्या प्राथमिक अहवालात सदर काळविटांचा मृत्यू ‘हेमोरेझीक सेप्टीसेमिया’ नावाच्या संसर्गजन्य विषाणूमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला …
Read More »सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेजमध्ये एनएसएस शिबिराची सांगता
बेळगाव : सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी चिंतामणराव पदवी पूर्व कॉलेज शहापूर डीडी 0024 बेळगावच्या एन. एस. एस. वार्षिक विशेष शिबिराची सांगता झाली. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून चिंतामणी कॉलेजच्या प्राचार्या श्रीमती विजया नाईक, समाज शास्त्राचे प्राध्यापक एस. एस. हिरेमठ सर, कॉलेजच्या लायब्ररीएन सविता गुड्डीन मॅडम, कॉलेजच्या एफ. …
Read More »कंग्राळी बुद्रुकमध्ये ४.५० कोटी रुपयांच्या विविध रस्त्यांच्या विकासकामांचे उद्घाटन
बेळगाव : कंग्राळी बुद्रुक गावात ४१ वर्षांनंतर होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर, ४.५० कोटी रुपये खर्चून विविध रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी बोलताना हे मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, यात्रेपूर्वी रस्ते आणि गटारे सुधारली जातील. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था …
Read More »काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे आदेश
बेळगाव : भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील एकूण 31 काळविटांच्या गूढ मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी वन विभागाच्या डीएफओ आणि आरएफओ यांना दिले आहेत. कुवेंपू नगर येथील प्राणी संग्रहालय विकास प्राधिकरण अध्यक्ष रंगास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, राणी चन्नम्मा …
Read More »श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक कॉलेजच्या शाश्वत वार्षिक क्रीडा महोत्सवाला प्रारंभ
बेळगाव : आधार एज्युकेशन सोसायटीच्या श्री शिव बसव ज्योती होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, बेळगाव यांच्या शाश्वत या वार्षिक क्रीडा स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध राष्ट्रीय कुस्तीपटू कामेश पाटील यांनी केले. स्वागत भाषण के. सानिका यांनी केले.डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. विनोद …
Read More »विनोद मेत्री याची ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : अनगोळ, बेळगाव येथील होतकरू शरीर सौष्ठवपटू विनोद पुंडलिक मेत्री याची जर्मनी येथे होणाऱ्या ‘मिस्टर युनिव्हर्स -2025’ या जागतिक पातळीवरील शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय चमूत अभिनंदनीय निवड झाली आहे. अनगोळ येथील रहिवासी दिवंगत पुंडलिक मेत्री यांचा चिरंजीव असलेल्या विनोद याला व्यायाम आणि तंदुरुस्तीच्या बाबतीत वडिलांचे नेहमीच प्रोत्साहन लाभले. विनोद …
Read More »शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी गप्पा टप्पा कार्यक्रम उत्साहात
बेळगाव : बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव शाखा आणि प्रगतिशील लेखक संघ बेळगाव यांच्यासाठी गप्प टप्पा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला सर्व कार्यकर्त्यांनी आपापली ओळख करून दिली. त्यानंतर अंनिसचे बेळगाव …
Read More »आणखी एक काळवीट मृत; 31 वर पोहोचला मृतांचा आकडा
बेळगाव : भूतरामहट्टी कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात काळवीटांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून आज सकाळी आणखी एका काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत काळविटांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. प्राणी संग्रहालयात एकूण 38 काळवीट (ब्लॅकबक) होती, मात्र आता केवळ 7 काळवीट जिवंत असून त्यांच्यावर उपचार व विशेष …
Read More »भुतरामनहट्टी राणी कित्तुर चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात आणखी एका हरणाचा मृत्यू; संख्या ३० वर
बेळगाव : रविवारी संध्याकाळी भुतरामनहट्टी येथील राणी कित्तुर चन्नम्मा मिनी प्राणीसंग्रहालयात एका हरणाचा मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या ३० झाली. वन परिक्षेत्र अधिकारी पवन कुरनिंग यांच्या मते, स्थानिक पशुवैद्यकीय पथकाने शवविच्छेदन केले आणि अंतिम संस्कार केले. यापूर्वी, गुरुवारी ८, शनिवारी पहाटे २०, शनिवारी रात्री उशिरा एक आणि रविवारी संध्याकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta