Sunday , July 26 2026
Breaking News

शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी गप्पा टप्पा कार्यक्रम उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या सभागृहात महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगाव शाखा आणि प्रगतिशील लेखक संघ बेळगाव यांच्यासाठी गप्प टप्पा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरवातीला सर्व कार्यकर्त्यांनी आपापली ओळख करून दिली. त्यानंतर अंनिसचे बेळगाव शाखेचे सचिव जोतिबा अगसीमनी यांनी हेरंब कुलकर्णी व उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने एकल पालक याविषयी महाराष्ट्र राज्यांप्रमाणे कर्नाटक राज्यातही एकल पालक असलेल्या पालक आणि त्यांच्या मुलांसाठी काही करता येईल काय? यावर विषेश चर्चा करण्यात आली. ज्या शाळांमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करता येईल काय? शिवाय या विद्यार्थ्यांसाठी गणवेश व शैक्षणिक साहित्य देता येईल काय, यासाठी काय करता येइल, याबद्दल विचार विनिमय करण्यात आला. याशिवाय मुलांवर चांगले संस्कार कसे करता येतील, त्यांना व्यसनापासून कसे दूर ठेवता येईल, मुले आपल्या पायावर कशी उभी राहतील यावर विचार मंथन करण्यात आले. तसेच महिलांचा पुर्नविवाह यावर देखील विचार मांडण्यात आले.
महात्मा फुले आजच्या मुलांना समजण्यासाठी महात्मा फुले दोनशेव्या जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या साहित्यावर शाळा शाळांमध्ये जाऊन व्याख्याने आयोजित करून मुलांचे प्रबोधन केले पाहिजेत. या आणि यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये कॉ. नागेश सातेरी, मराठी विद्यानिकेतनचे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, एस. पी. चौगुले, सूर्याजी पाटील, अंनिसचे सचिव जोतिबा अगसीमनी, शिवाजी हसनेकर, मधू पाटील, गौरी ओऊळकर, नीला आपटे, लता पावशे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *