Monday , September 21 2026
Breaking News

आणखी एक काळवीट मृत; 31 वर पोहोचला मृतांचा आकडा

Spread the love

 

बेळगाव : भूतरामहट्टी कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात काळवीटांच्या मृत्यूची मालिका सुरूच असून आज सकाळी आणखी एका काळवीटाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृत काळविटांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. प्राणी संग्रहालयात एकूण 38 काळवीट (ब्लॅकबक) होती, मात्र आता केवळ 7 काळवीट जिवंत असून त्यांच्यावर उपचार व विशेष निगराणी ठेवण्यात येत आहे.

बॅक्टेरियाचा संसर्ग असल्याचा संशय
काळविटांच्या मृत्यूमागे बॅक्टेरियाचा संसर्ग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात विशेष पशुवैद्यकीय तज्ज्ञ पथकाने तपासणी केली असून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल मिळेपर्यंत मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार नाही.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *