Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

मद्यपीकडून बार मॅनेजरवर हल्ला; काकती येथील घटना

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त काल शनिवारी दारूविक्रीवर बंदी असल्याने आज रविवारी पहाटेच काकती येथील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये बसून दारू प्राशन करणाऱ्या एका मद्यपी व्यक्तीने बार मॅनेजरवर जबर हल्ला केला. यामध्ये बार मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आरोपी सुनील …

Read More »

नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी गेलेल्या बेळगावच्या दोन कमांडोचा मृत्यू

  बेळगाव : नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी गेलेल्या बेळगाव येथील कमांडो सेंटरच्या दोन कमांडोचा बोट उलटल्याने मृत्यू झाला. काल सकाळी बेळगाव येथील कमांडो प्रशिक्षण विभागाच्या जवानांना नदी क्रॉसिंग प्रशिक्षणासाठी तिलारी धरणाच्या बॅकवॉटरच्या परिसरात आणण्यात आले होते. दरम्यान नदी क्रॉसिंग प्रशिक्षण सुरु असताना बोट उलटली यामध्ये बेळगाव येथील जेएल विंग कमांडो ट्रेनिंग …

Read More »

आफ्रिकेतील रवांडा देशाच्या उच्चायुक्तांची बेळगावला भेट

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात आलेल्या पूर्व आफ्रिकन देश रवांडाच्या उच्चायुक्त श्रीमती जॅकलिन मुकांगिरा यांनी सुवर्ण विधानसौधला भेट दिली. यावेळी जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी जॅकलिन यांचे स्वागत केले. मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या विधानसभा व विधानपरिषदेचे कामकाज तसेच विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाची माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम …

Read More »

महिलांचे नग्न व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; बेळगावात विचित्र प्रकार

  तीन गुन्हे दाखल बेळगाव : मुंबई क्राईम ब्रँच, गुप्तचर विभागाकडून व्हिडीओ कॉल केला असल्याचे भासवून ब्लॅकमेल करून महिलांचे नग्न व्हिडिओ काढल्याची घटना बेळगावात घडली आहे. याप्रकरणी बेळगाव सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले की, बेळगावात तीन घटना घडल्या आहेत. मुंबई …

Read More »

बेळगाव शहर, उपनगरात गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत

  बेळगाव : मागील काही दिवसांपासून आपल्या लाडक्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेशभक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले आणि श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. विधिवत पूजन करून आरती करण्यात आली. आपल्या लाडक्या बाप्पाला मोदकाचा तसेच गोडधोडाचा …

Read More »

जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत पंडित नेहरू हायस्कूलचे घवघवीत यश

  बेळगाव : विश्वभारत सेवा समिती संचलित पं. नेहरू हायस्कूल शहापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कास्यपदक मिळविलेले आहे. प्रथम क्रमांक : वेदांत मासेकर (73 किलो वजन गट), अंजली शिंदे (40 किलो वजन गट), रोहन नायकोजी (45 किलो वजन गट) द्वितीय क्रमांक : …

Read More »

बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

  बेळगाव : बेळगावचे नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आपल्या शासकीय निवासस्थानात पत्नी कुटुंबासह गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली. शनिवारी त्यांनी चन्नम्मा सर्कल येथील गणपती मंदिर मध्ये पत्नी अंकिता आणि मुलगा आयान सह गणपती बाप्पाची आरती केली. तेजस्वी स्मित आणि आदराच्या भावनेसह, बेळगावचे डीसी मोहम्मद रोशन चन्नम्मा सर्कलमधील गणपती मंदिरात भक्तीनेभावाने …

Read More »

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय बेळगावच्या मुस्लिम बांधवांनी घेतला आहे. हा सण २२ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी येथील मुस्लिम धर्मगुरू व विविध मुस्लिम संघटनांच्या प्रमुखांची बैठक अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बेळगाव …

Read More »

बेळगाव शहरासह परिसरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी; बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी

  बेळगाव : बेळगाव शहरासह परिसरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून फळा-फुलांसह सजावटीच्या साहित्यानी बाजारपेठ फुलून गेली आहे. बेळगाव शहरासह उपनगरातील बहुतेक गणेशोत्सव मंडळानी आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा जल्लोषात साजरा केला आहे. ढोल-ताश्यांच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी करत गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र भक्तिमय वातावरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव …

Read More »

इस्कॉनतर्फे राधाष्टमी 11 सप्टेंबरला साजरी होणार

  बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी राधा गोकुळ आनंद मंदिरात साजरी होत आहे. त्यानिमित्त सायंकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत अभिषेक, सात ते साढे आठ वाजेपर्यंत प. पू. भक्ति रसामृत स्वामी महाराज यांचे कथाकथन, महाआरती आणि रात्री साडेआठ नंतर …

Read More »