बेळगाव : येथील जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)च्या वतीने आज गोवावेस येथील न्यू गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थिनीना शूज वितरणाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जायंट्सचे अध्यक्ष अविनाश पाटील, संजय पाटील, लक्ष्मण शिंदे, शिवराज पाटील, विजय बनसुर, यल्लाप्पा पाटील, मधु बेळगावकर, विश्वास पवार, भरत गावडे, मोहन पत्तार, दिगंबर किल्लेकर इत्यादी हजर होते. …
Read More »कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू
बेळगाव : कपडे धुण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास खादरवाडी येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव सुनीता सोमनाथ पाटील (वय ५०) असे असून या महिलेच्या पश्चात पती, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. मिळालेली अधिक माहिती अशी …
Read More »कोलकाता येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांचे बेळगावात आंदोलन
बेळगाव : कोलकात्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला पदव्युत्तर प्रशिक्षण (पीजीटी) डॉक्टरच्या लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज बेळगावात डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी एक भव्य निषेध रॅली काढली. कोलकाता येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर केवळ बलात्कारच नाही तर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. क्रूर राक्षसी वर्तन करणाऱ्या आरोपींना …
Read More »संगोळी रायण्णा पुतळा वाद : उचगाव येथे आंदोलनासाठी निघालेल्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
बेळगाव : क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी गावात आंदोलन करणाऱ्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा स्थापन करण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. उद्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची जयंती असून …
Read More »स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे शानदार उद्घाटन
बेळगाव : तरुणांमध्ये प्रारंभापासून व्यायामाबरोबरच उत्तम, बळकट शरीराची आवड असली पाहिजे तसेच कोणत्याही व्यसनापासून दूर राहिले पाहिजे, असे उद्गार पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बानियांग यांनी केळकरबाग येथील स्ट्रेंथ स्टुडिओ व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी काढले. पुढे बोलतांना म्हणाले की, पावले परिवाराने व्यायाम शाळेची उभारणी केल्याने युवक- युवतीना याचा लाभ होईल. …
Read More »कंग्राळ गल्ली श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न
बेळगाव : कंग्राळ गल्लीतील श्री गणेशोत्सव मंडळाची बैठक गल्लीतील ज्येष्ठ नागरिक व पंच श्री. शंकरराव बडवानाचे यांच्या अध्यक्षतेखाली भरून या बैठकीत सन 2024-25 या वर्षाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. बैठकीच्या सुरुवातीस गल्लीतील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर गतवर्षीच्या जमाखर्चाला मंजुरी अनंतराव पाटील देण्यात आली. …
Read More »जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या विविध सूचना
बेळगाव : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे अतिवृष्टी/पूरस्थिती निर्माण झाली असून, नुकसान झालेल्या घरांची ठिकाणे ओळखून त्याची माहिती गृहनिर्माण महामंडळाच्या पोर्टलवर टाकून तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, शेती व बागायती पिकांच्या नुकसानीचे संबंधित विभागांसोबत संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे व नुकसानीची आकडेवारी रिलीफ पोर्टलमध्ये समाविष्ट …
Read More »यल्लम्मा डोंगरावर कुकरचा स्फोट; १० हून अधिक लोक जखमी
बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरातील एका हॉटेलमध्ये कुकरचा स्फोट होऊन १० हून अधिक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना सौंदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना हुबळी किम्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे, सौंदत्ती येथे देवाच्या दर्शनासाठी आलेले भाविक सौंदत्ती यल्लम्मा डोंगरातील …
Read More »नावगे कारखाना दुर्घटना: खासदार जगदीश शेट्टर यांनी मृत कामगाराच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नावगे औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्याला नुकत्याच झालेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज कारखान्याला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व अपघात होऊ नयेत यासाठी कारखानदारांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे सांगितले. …
Read More »कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे उद्या बेळगाव रेल्वे स्थानकावर आंदोलन
बेळगाव : बेळगाव रेल्वे स्थानकावर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी 14 ऑगस्टला तीव्र आंदोलन करणार असल्याचे कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी सांगितले. बेळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक दलित संघर्ष समितीचे रवी बस्तवाडकर यांनी दोन वर्षांपूर्वी बेळगाव शहरातील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta