बेळगाव : हिंडलगा रोडवरील गणपती मंदिर परिसरातील अरगन तलावात आज शनिवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. तलावात स्वतःला झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या केल्याचे तपासात आढळून आले. याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कॅम्प येथील विनायक मंदिरा शेजारील अरगन तलावात दोन मृतदेह तरंगत असल्याचे मिलिटरी प्रशासनाना लक्षात आले. लागलीच याची …
Read More »१ नोव्हेंबर काळ्या दिनी सीमाबांधवांचा एल्गार!
बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात आली. निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी …
Read More »सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरी काढली. या फेरीत सहभागी झालेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे व्यक्तव्य सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शुक्रवारी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीवर …
Read More »परवानगी विना सायकल फेरी; मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज शुक्रवारी एक नोव्हेंबर रोजी सालाबादप्रमाणे सरकारच्या विरोधात निषेध घेण्यासाठी काळातील सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल फेरीला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली होती मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने बेळगाव शहरात निषेध सायकल फेरी काढण्यात आली. विना परवानगी …
Read More »बसुर्तेत धरणाला जागा देण्यास गावकऱ्यांचा विरोध; सर्व्हे करणाऱ्यांना विचारला जाब
बेळगाव : बसुर्ते येथे धरण उभारणीच्या नावाखाली सर्व्हे करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी भाजप नेते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जाब विचारला. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून सर्व्हे करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. याला गावकऱ्यांनी विरोध करत जाब विचारला. मागील काही दिवसांपासून गावातील २५० एकर जागेचे संपादन करुन धरण …
Read More »काळ्या दिनासंदर्भात समिती पदाधिकाऱ्यांनी केली पोलीस आयुक्तांशी चर्चा
बेळगाव : 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या सायकल मिरवणुकीसंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्याबरोबर झाली. या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी समितीच्या कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. यावेळी समितीने आयुक्तांनी सांगितले की, याआधी कधीही कन्नड -मराठी असा वाद निर्माण झाला नाही. हा निषेध मोर्चा केंद्र …
Read More »बेळगाव शहरातील वाहतूक मार्गात उद्या बदल
बेळगाव : शहरातील वाहतूक मार्गात १ नोव्हेबरला बदल करण्यात येत आहे. प्रमुख मार्गऐवजी पर्यायमार्गे वाहतुकीसाठी मार्ग खुला असणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्तांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. बेळगावात १ नोव्हेंबरला राज्योत्सव मिरवणूक आहे. यानिमित्त प्रमुख मार्गावरील वाहतुकीत बदल असेल. जिल्हा क्रीडांगणावरून मिरवणूक सुरु होईल. नेहरुनगर, बी. आर. आंबेडकर उद्यान, चन्नम्मा …
Read More »निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : बेळगांव येथील निजलिंगाप्पा साखर आयुक्त कार्यालयात रयत संघटनेचे पदाधिकारी व सर्व कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये साखर आयुक्तांची परवानगी घेऊनच १५ नोव्हेंबर पूर्वी ऊस दर जाहीर करावा, यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी, ऊसाला खर्चाच्या तुलनेत …
Read More »उद्यमबाग परिसर अंधारमय; रमाकांत कोंडुस्कर यांनी केली हेस्कॉम अधिकाऱ्यांची कानउघडणी
बेळगाव : ऐन दिवाळीत संपूर्ण शहर विद्युत रोषणाईने सजले आहे तर दुसरीकडे शहरातील उद्यमबाग परिसरातील पथदीप मागील सहा महिन्यांपासून बंद पडले आहेत त्यामुळे येथील कारखान्यात रात्रपाळीला कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अंधारातूनच ये- जा करावी लागत आहे. येथील कारखानदारांनी सदर बाब संबंधित लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली मात्र लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे दुर्लक्ष …
Read More »सायकल फेरीत मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे; महाराष्ट्र एकीकरण समितीचे आवाहन
बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना 1 नोव्हेंबर 1956 रोजी त्यावेळच्या केंद्र सरकारने मुंबई राज्यातील फार मोठा मराठी प्रदेश कर्नाटकात घातला आहे. या अन्यायाविरुद्ध सीमा प्रदेशातील मराठी जनता गेली 68 वर्षे एक नोव्हेंबर रोजी काळादिन आचरणात आणून केंद्र सरकारचा निषेध करते अन्याय झालेला सीमा प्रदेश महाराष्ट्रात सामील करावा या मागणीसाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta