जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती बेळगाव : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने जगाला भारताच्या शक्तिशाली लोकशाही आणि प्रबळ घटनेचे महत्त्व जगाला कळावे यासाठी, कर्नाटक सरकारने रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या एक तासाच्या वेळेत कर्नाटक सरकारने राज्यातील 30 जिल्ह्यात मानवी साखळीचे आयोजन केले आहे. मानवी साखळी …
Read More »२० कोटींच्या नुकसानभरपाई प्रकरणाला नवे वळण!
बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्याच्या रुंदीकरणामुळे जमीन गमावलेल्या जमीन मालकांना २० कोटी रुपयांची भरपाई देण्याच्या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. महापालिकेने जमीन परत देण्याचे मान्य केले आणि जमीन मालकानेही जमीन परत घेण्याची तयारी दर्शविली असल्याचे समजते. स्मार्ट सिटी रोडच्या बांधकामामुळे महापालिकेला अडचणी येत होत्या आणि या प्रकरणाने धारवाड उच्च …
Read More »श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!
बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 15-09-2024 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव शंकरराव देसाई यांनी …
Read More »पाच दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन उत्साहात
बेळगाव : पाचव्या दिवशीच्या घरगुती गणेशमूर्तीचे आज बुधवारी विसर्जन मोठ्या भक्तीभावाने करण्यात आले. त्यामुळे महापालिकेतर्फे विसर्जन तलावांवर सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. शहरात यंदा शनिवारी ७ रोजी गणेशमूर्तीचे उत्साहात आगमन झाले होते. त्यानंतर काही जणांनी दीड दिवसाच्या गणपतीला निरोप दिला होता. मंगळागौर झाल्यानंतर पाचव्या दिवशी घरगुती विसर्जन करण्याची …
Read More »श्री गणेश २०२४ चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता प्रताप कालकुंद्रीकर; बेस्ट पोझर मोरेश देसाई
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयच्या सभागृहात २० व्या श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करताना प्रताप कालकुंद्रीकर याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन …
Read More »मराठी विद्यानिकेतन शाळेला खो-खो स्पर्धेत दुहेरी मुकुट
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. मराठी विद्यानिकेतन मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत प्राथमिक विभाग मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात महांतेश नगर शाळेचा एकतर्फी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात 14 नंबर शाळेचा सलग दुसऱ्यांदा पराभव करत तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले. …
Read More »विद्याभारती राज्य अथलेटिक स्पर्धेत संत मीराचे यश
बेळगाव : बिदर येथे विद्याभारती कर्नाटक आयोजित विद्याभारती बिदर जिल्हा पुरस्कृत राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत अनगोळमधील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण तीन रौप्य एक कांस्यपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटात नताशा चंदगडकर हिने लांब उडी व तिहेरी उडीत दोन सुवर्णपदक, समीक्षा …
Read More »येळ्ळूर सिद्धेश्वर मंदिर नूतनीकरण लोकार्पण सोहळा सोमवारी
येळ्ळूर : सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील सिद्धेश्वर मंदिराचे सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार मंडळ यांच्या पुढाकाराने व गावातील व गावाबाहेरील असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून, नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा सोमवार (ता. 16) रोजी सकाळी 11-00 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. मंदिराचे नूतनीकरण करण्यासाठी असंख्य भाविक भक्त, दानशूर …
Read More »कावळेवाडीच्या प्रेम बुरुडची मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रात निवड
कावळेवाडी : येथील उदयोन्मुख धावपटू प्रेम यल्लापा बुरुड याची मद्रास रेजिमेंट क्रीडा केंद्रात खास खेळाडूंसाठी लष्करी प्रशिक्षण केंद्रात विलिंग्डन येथे राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. मद्रास रेजिमेंट हे लष्करी क्रीडा केंद्र, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी व विविध खेळात देशातील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करावी या हेतूने …
Read More »श्री गणेश 2024 शरीर सौष्ठव स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta