बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने रविवार दिनांक 15-09-2024 रोजी ठीक सकाळी 11.30 वाजता शंकर पार्वती मंगल कार्यालय उचगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती सोसायटीचे संस्थापक चेअरमन श्री. जवाहरराव शंकरराव देसाई यांनी दिली.
यामध्ये साहित्य भूषण पुरस्कार प्रा. सौ. अरुणा जनार्दन नाईक, शिक्षक भूषण पुरस्कार प्रा. महादेव खोत, सेवा भूषण पुरस्कार श्री. गुरुनाथ शिंदे, समाज भूषण पुरस्कार श्री. दत्तात्रय (डी.पी.) परशराम शिंदे, उचगाव भूषण पुरस्कार डॉ. प्रवीण भाऊराव देसाई यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच एसएसएलसी परीक्षेत उचगाव केंद्रात प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा, सभासदांच्या मुलांचा गुणगौरव, विविध क्षेत्रात निवड तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्यांचा सत्कार करून गौरविण्यात येणार आहे.
प्रा. अरुणा जनार्दन नाईक
प्रा. अरुणा जनार्दन नाईक या मूळच्या बेळगांवच्या बी.एससी.एम. ए. पदवीत्तर आहेत. 1973 पासून जी. एस. एस. व कॉलेजच्या हिंदी विभागाध्यक्ष होत्या, नंतर आरपीडी कॉलेजच्या प्राचार्या म्हणून 2012 मध्ये सेवानिवृत्त झाल्या त्यांनी अनेक साहित्यिक व सांस्कृतिक नाट्य वाचन, अभिनय, कथाकथन, शास्त्रीय संगीत कार्यक्रमांचे केले. हिंदी व मराठी काव्यरचना ही केल्या. हरी पाटील कथासंग्रहास उत्तम बाल साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. पंत बाळेकुंद्री यांचे संक्षिप्त चरित्र हिंदी व कन्नड साहित्य कृतींचा मराठी व हिंदीमधून अनुवाद स्वप्न सारस्वत. चाणक्य. स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास व गांधीजी. मोहम्मद रफी गायक या जादूगार ‘संचू’ या कन्नड कादंबरीचा मराठी व हिंदीतून अनुवाद (नॅशनल बुक ट्रस्टतर्फे) शारदोत्सव महिला सोसायटी भारत विकास परिषद, फिन्स, प्रोबस, नाट्यंकुर, सरस्वती वाचनालय तसेच निरनिराळ्या विषयांवर अनेक ठिकाणी व्याख्याने संगीत, वाचन व प्रवासाचा छंद म्हणून त्यांना सोसायटीच्या वतीने साहित्य भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
प्रा. महादेव खोत
प्रा. महादेव खोत हे उचवडे जांबोटीचे सुपुत्र. शालेय शिक्षण गावातच झाले. माध्यमिक शिक्षण किणये येथे झाले. राणी विद्यापीठातून एम ए मराठी पदव्युत्तर झाले. इन बेळगाव न्यूज चॅनेलवर काम करत आहेत. सध्या आर पी डी महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
साहित्य : गावाकडच्या गोष्टी समांतर क्रांती या प्रकाशानातून “डोंगराळ माणसं” हे पुस्तक प्रकाशन झाले. अक्षरदिप या अंकातून कविता प्रसिद्ध आहेत. हेळवी ही कथा पुढारी दैनिक अंकातून प्रसिद्ध झालेली आहे. कविता : बाप, सीमाभाग, लोकशाही, माणसं यासारख्या अनेक कविता लेखन करून प्रसिद्धी मिळविलेल्याबद्दल आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांना शिक्षक भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
गुरुनाथ जनार्दन शिंदे
गुरुनाथ जनार्दन शिंदे हे मूळचे बेळगांवचे बालतरुण व सध्याचे वृद्ध पण व नामस्मरण म्हणजे गणिताची आठवण या पद्धतीने ते सेवेत असतात. जे एन मेडिकल कॉलेज येथे लॅब टेक्निशियन डीप्लोमा केले. दिन दुबळ्यांना मदत करणे देवधर्म चांगल्या वाईट अनुभवाची शिदोरी घेऊन राज भवन मुंबई पर्यंतचा प्रवास करत होते. देवगड, मुंबई, गुजराथ, येथे मेडिकल कॅम्प घेत असत. सध्या ते जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष आहेत. म्हणून त्यांना सोसायटीच्या वतीने सेवा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे.
दत्तात्रय परशराम शिंदे
दत्तात्रय परशराम शिंदे हे मूळचे बेळगांवचे माध्यमिक शिक्षण चिंतामणराव हायस्कूल येथे झाले. पुणे येथे सिव्हिल इंजिनिअर परीक्षा पास झाल्यावर महाराष्ट्राच्या पाठबंधारे खात्यात 35 वर्षे नोकरी करून शाखा अभियंता म्हणून 1995 साली निवृत्त झाले. पुणे येथील पवना योजना तिलारी, सांगली नगर, इचलकरंजी सेवा करून कामाचं आदर्श महाराष्ट्र सरकारने पारितोषिक देऊन गौरव केले. वयाच्या 87 व्या वर्षी सुद्धा मराठा समाज सुधारणा मंडळ, वधुवर सूचक, मराठी नाट्य परिषद यातून अहोरात्र समाज सेवेत राहतात म्हणून त्यांना सोसायटीच्या वतीने समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
डॉ. प्रवीण भाऊराव देसाई
डॉ. प्रवीण भाऊराव देसाई हे उचंगाव येथून निवृत्त मुख्याध्यापक कै. बी. डी. देसाई यांचे सुपुत्र शालेय शिक्षण उचंगाव येथे झाले. बीएचएमएस शिक्षण वेंगुर्ले येथे झाले. सध्या ते डॉक्टर पेशा सांभाळत आहेत. डॉ. देवदत्त राणे व डॉक्टर विजय देसाई यांच्याकडून रुग्ण हाताळण्याचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते उचंगाव येथील पंचक्रोशीतील रुग्णांना अहोरात्र सेवा देत आहेत. उचंगाव गावच्या विकासासाठी मळेकरणी देवस्थान कमिटी मार्फत परिसर सुशोभिकरण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हणून आमच्या सोसायटीच्या वतीने त्यांना उचंगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.