Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

मर्कंटाईल सोसायटीला जॉईंट रजिस्ट्रार यांची भेट

  बेळगाव : यंदा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या दि. मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला बेळगावचे जॉईंट रजिस्ट्रार डॉ. सुरेशगौडा पाटील आणि त्यांचे सहकारी मुत्ताप्पा गौडप्पणावर यांनी सदिच्छा भेट देऊन सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. मर्कंटाइल सोसायटीचे चेअरमन श्री. संजय मोरे यांनी त्यांचे स्वागत केले आणि सोसायटी बद्दलची माहिती दिली. शाखा व्यवस्थापक …

Read More »

अवैध गोवंश तस्करी प्रकरणी बेळगावातील चाैघे ताब्यात, ९ जनावरांची सुटका; २९ लाखांचा मुद्देमाल जप्त

  बेळगाव : बेकायदेशिररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील चाैघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मालवाहू ट्रक, एक कार आंबोली पोलीसांनी जप्त केली आहे. या धडक कारवाईत पाेलिसांनी एकूण २९ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर जखमी बैलासह उर्वरीत बैल गोवा राज्यातील करासवाड- शिकेरी येथील गो शाळेत सुखरूप …

Read More »

जायंट्स ग्रुप मेनतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

  बेळगाव : जायंट्स या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय नाना चुडासमा यांचा १७ जून हा जन्मदिन दरवर्षी जायंट्स चळवळीमध्ये विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. यंदा जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने महावीर ब्लड बँक येथे आज रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास १५ हुन अधिक सदस्य उपस्थित होते. या प्रसंगाचे औचित्य …

Read More »

बेळगावात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ३० हून अधिक ऑटो जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरात वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून विहित मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करून नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली ३० हून अधिक ऑटो जप्त केले आहेत. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून शाळेतील मुलांना शाळेत सोडणे हे पालकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत सोडण्यासाठी ऑटो रिक्षा आणि विविध …

Read More »

अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण; डॉक्टरच्या फार्महाऊसमध्ये आढळले तीन भ्रूण

  बेळगाव : अर्भक विक्री प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून आरोपी असलेला डॉक्टर अब्दुलगफार लाड खान यांच्याकडून भ्रूण हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या सूचनेवरून पोलीस, आरोग्य विभाग आणि एफएसएल पथकाने आज (१६ जून) कित्तूर तालुक्यातील तिगडोळी गावाजवळील बनावट डॉक्टराच्या फार्महाऊसची तपासणी केली असता शेतात …

Read More »

चलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात

  बेळगाव : चलवेनहट्टी येथे बटाटा लावणी जोमात असून बटाटा लावणीसाठी शेतकऱ्यांचा धावपळ सुरु आहे. आठवड्याभरापूर्वी पावसाने दमदार हजेरी लावून उघडीप दिल्याने बटाटा लावणीला योग्य हंगाम निर्माण झाले आहे.आडीज ते तीन महिन्यात येणारे हे पीक चलवेनहट्टी, अगसगे हंदिगनूर, म्हाळेनहट्टी, मण्णीकरे, केदनूर, कडोली, बोरकेनहट्टी या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या …

Read More »

“लक्ष्या- बाळ्या” हटाव मोहिमेचा खरा सूत्रधार “दिग्गुभाई”च!

  बेळगाव शहरात सध्या चर्चेत असणाऱ्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप हे दिवसागणिक आणखीनच उघडे पडत आहेत. मुळात अध्यक्ष झाल्यानंतर केलेला गैरकारभार हा ट्रेलरच म्हणावा लागेल कारण खरा पिक्चर तर अध्यक्ष होण्याआधीपासूनच “दिग्गुभाई”ने सुरू केला होता. 2020 साली पार पडलेल्या बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री “दिग्गुभाई”ने लक्ष्या-बाळ्या हटाव (समाजाच्या नावाची) बँक …

Read More »

येळ्ळूरच्या महिला कुस्तीपटूंचे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश

  बेळगाव : गोवा येथे राष्ट्रीय स्तरावर खेळ प्राधिकरण टी ए एफ् आय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत येळ्ळूरच्या महिला कुस्तीपटू‌नी घवघवीत यश संपादन केले. म्हापसा येथील पेडम स्पोर्टस कॉम्प्लेक्स गोवा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत बेळगाव, गोवा, केरळ, आंध्रप्रदेशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात कु. आराध्या …

Read More »

‘श्री शनैश्वर’ सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन खासदारांची भेट

  बेळगाव : बेळगावमधील श्री शनैश्वर एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेण्यात आली. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत सर्किट हाऊस येथे किरण जाधव आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खासदार जगदीश शेट्टर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या प्रगतीचा अहवाल, संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे सामाजिक, …

Read More »

बुडा घोटाळाप्रकरणी तपास सुरु आहे : मंत्री सतीश जारकीहोळी

  बेळगाव : गेल्या तीन महिन्यांपासून बैठकीसाठी दिरंगाई होत असलेली शहर विकास प्राधिकरणाची बैठक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत अखेर पार पडली असून या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोलताना सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव शहराच्या विकासाबाबत चर्चा करून अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, …

Read More »