Thursday , June 4 2026
Breaking News

बेळगाव

मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर सामान्य ज्ञान स्पर्धेत घवघवीत यश

  बेळगाव : 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये येळ्ळूर येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळेने घवघवीत यश संपादन केले. ही सामान्य ज्ञान स्पर्धा बेळगाव, खानापूर व येळ्ळूर अशा तीन विभागांमध्ये घेण्यात आली होती. ही स्पर्धा तिसरी ते पाचवी …

Read More »

ज्युनियर मिस्टर इंडिया स्पर्धेत बेळगावला दोन सुवर्ण पदके

  बेळगाव : ज्युनियर मि. इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत बेळगावच्या दोन शरीरसौष्ठवपटूनी घवघवीत यश संपादन केले आहे. कुचबिहार या ठिकाणी नुकताच 57 व्या ज्युनियर राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.13 राज्यातून जवळपास 97 बॉडी बिल्डिंग स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पश्चिम बंगालच्या अंकुश गुहा याने आपल्या पिळदार …

Read More »

मराठा बँकेच्या चाव्या सत्ताधारी गटाकडे; एका जागेवर अपक्ष विजयी

  बेळगाव : संपूर्ण बेळगाव शहराचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाच्या पॅनलने बाजी मारली असून केवळ सामान्य गटातील एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील आणि विद्यमान चेअरमन दिगंबर पवार यांच्या गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखले आहे. रविवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी …

Read More »

बाळंतिणींच्या मृत्यूबद्दल राज्य भाजप महिला मोर्चाच्यावतीने निषेध

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय बाळंतिणीचा काल बेळगावच्या बिम्स रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा संताप व्यक्त करत महिला मोर्चा भाजप कर्नाटकतर्फे सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या तसेच काँग्रेस सरकारच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यात आला. दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करावी. योग्य काळजी आणि आरोग्य सेवेशिवाय …

Read More »

बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू

  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी त्यांना बिम्सवर विश्वास नसल्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह इतरत्र पाठवण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गौडवाडा येथील वैशाली कोटबागी नावाच्या २० वर्षीय गर्भवती महिलेला काल प्रसूतीसाठी बेळगावच्या बिम्स …

Read More »

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय …

Read More »

१९२४च्या काँग्रेस अधिवेशनामुळे स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले : प्राचार्य आनंद मेणसे

  बेळगाव अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण निमित्त अंनिसतर्फे विशेष व्याख्यान बेळगाव : हिंदू मुस्लिम, दिन दलित, दुबळे, कामगार, खासकरून महिलांसाठी राष्ट्रीय ऐक्य हा काँग्रेसचा कार्यक्रम होता. काँग्रेस चळवळीचा कार्यकर्ता जर व्हायचा असेल तर दोन हजार मीटर सूत कताई करून ते काँग्रेस कमिटीकडे सोपवायचं. पूर्वी काँग्रेस हा राजकीय पक्ष नव्हता तर …

Read More »

जीवन विवेक प्रतिष्ठानतर्फे गांधी आगमन आनंद सोहळ्याचे आयोजन

  बेळगाव : जीवन विवेक प्रतिष्ठान व गांधी विचारप्रेमी यांच्या वतीने महात्मा गांधी यांच्या बेळगाव आगमनाला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल दिनांक 20 डिसेंबर रोजी आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बेळगाव मधील धर्मवीर संभाजी महाराज चौक या ठिकाणी संगीत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. म. गांधी हे १९२४ सारी …

Read More »

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यांकडे राज्य सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

  बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात काँग्रेस अधिवेशन पार पडले त्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून राज्य सरकार विशेष कार्यक्रम राबवत आहे. बेळगाव येथे दिनांक 26 आणि 27 डिसेंबर रोजी शतक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात विविध ठिकाणी विद्युत रोषणाई …

Read More »

साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगावतर्फे सोमवार दिनांक १६ डिसेंबर २०२४ ते शनिवार दिनांक २१ डिसेंबर २०२४ या कालावधीत काव्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक व माध्यमिक शाळेतील मुलांचे लेखन कौशल्य सुधारावे, मराठी काव्य प्रकारांची ओळख व्हावी, मुलांना मराठी …

Read More »