Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

यळेबैल येथे स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचा उद्घाटन सोहळा उत्साहात

  बेळगाव : यळेबैलमध्ये स्वराज मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड यळेबैल सोसायटीचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा संपन्न झाला. रविवार दिनांक 2 जून 2024 रोजी सकाळी 12 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोसायटीचे चेअरमन श्री. राजाराम लक्ष्मण यळ्ळूरकर त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ पंच कमिटी चेअरमन यळेबैल श्री. वैजू …

Read More »

मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण : जिल्हाधिकारी नितेश पाटील

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी (4 जून) रोजी होणार असून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयात बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. यासंबंधीची पूर्व तयारीची पाहणी केल्यानंतर रविवारी मीडिया सेंटर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत …

Read More »

अंगणवाडी सेविकेचा बालकांच्या पोषण आहारावर डल्ला

  बेळगाव : अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराचा बेकायदा साठा केलेल्या ठिकाणी बेळगाव महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या बेकायदेशीर संकलनाच्या प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि. ३१) मे रोजी रात्री टिळक चौकाजवळील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. यानंतर सीडीपीओने येऊन तत्काळ तपासणी केली असता तो …

Read More »

माधुरी जाधव फाउंडेशनच्यावतीने मृत निराधार महिलेवर अंत्यसंस्कार

  बेळगाव : माधुरी जाधव फाउंडेशन यांच्यावतीने निराधार मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांता कोलकार ही 70 वर्षीय महिला जुने बेळगाव येथील निराधार केंद्रामध्ये कित्येक वर्षापासून वास्तव्यास होती. गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने सरकारी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही माहिती निराधार केंद्राचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी यांनी सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव यांना …

Read More »

कविता जगण्याची उमेद देते : ऍड. नामदेव मोरे

  कावळेवाडी : साहित्याचे वाचन करा. साहित्यातून समाज घडविण्याचे कार्य होते कविता जगण्याचा मार्ग दाखवते कवी श्रेष्ठ असतो. आजूबाजूच्या घडत जाणाऱ्या घटनांवर तो भाष्य करतो शब्दातून तो व्यक्त होत जातो. मनातील भावभावनांचे सुंदर जग तो काव्यातून प्रकट करतो मराठी भाषा संवर्धनासाठी असे उपक्रम राबविणे आवश्यक आहे. नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ …

Read More »

कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्यपूर्वक अभिवादन!!

  बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील स्मारकात शनिवारी सकाळी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. १ जून १९८६ साली सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात …

Read More »

सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचा प्रारंभोत्सव उत्साहात

  बेळगाव : सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथे शाळा प्रारंभोत्सव खुप मोठ्या उत्साहात व वेगळ्या रीतीने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामदेवता दुर्गा देवीची ओटी भरण्यात आली. नंतर बैलगाडीमध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांना बसून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. नंतर आत येताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन औक्षण करुन फुल …

Read More »

पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

  बेळगाव : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरण बॅकवॉटर विभागाच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यालयाबाहेर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुमार बसय्या धुमकीमठ (४९) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी काल रात्री उशिरा विभागाच्या आवारात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. जवळपास 20 वर्षे सरकारी नोकरीत असलेले कुमार गेल्या …

Read More »

बाकनूर येथे सातेरीदेवी सोसायटीचे उद्घाटन

  बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री सातेरी देवी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन नुकताच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे प्रमुख सल्लागार नारायण मजुकर होते. माजी महापौर शिवाजी सुंठकर, बेळवट्टी येथील महालक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई, येळ्ळूर येथील नेताजी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील, येळूर कृषी उत्पन्न सोसायटीचे अध्यक्ष कर्लेकर …

Read More »

बेळगावमध्ये ‘हम दो हमारे बारा’ चित्रपटाविरोधात निदर्शने

  बेळगाव : मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारा ‘हम दो हमारे बारा’ हा चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आज बेळगावमधील एसडीपीआय संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. राणी कित्तूर चन्नम्मा चौकात मुस्लिम समाजातील विविध संघटनांच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले होते. ७ जून रोजी ‘हम दो हमारे …

Read More »