Monday , September 21 2026
Breaking News

राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगावच्या वेटलिफ्टिंग टीमचे घवघवीत यश

Spread the love

 

बेळगाव : म्हैसूर येथे झालेला कर्नाटक स्टेट वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेत बेळगावच्या एकूण 16 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी स्वस्तिका मिरजकर हिने 87 वजनी गटात सुवर्णपदक, रोहित मुरकुटे यांने 55 किलो वजनी गटात सुवर्ण, समीक्षा मानमोडे हिने 59 किलो वजनी गटात सुवर्ण, आदर्श धायगोंडे याने 81 किलो वजनी गटात रौप्य, नागेश अनगोळकर यांनी 96 किलो वजनी गटात रौप्य, साईशा गोंडाळकर हीने 45 वजनी गटात रौप्य, आदिती पाटील हिने 40 किलो वजनी गटात रौप्य तर सृष्टी मुतगेकर हिने 55 किलो वजनी गटात रौप्य पदक, ऋतिका बांडगी हिने 64 किलो वजनी गटात कास्यपदक पटकावत युथ गटामध्ये बेळगावला चॅम्पियनशिप सुद्धा मिळवून दिले.
या सर्व खेळाडूंना बेळगावचे क्रीडा विभागाचे उपसंचालक श्री. श्रीनिवास यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तसेच जिल्हा वेटलिफ्टींग कोच सदानंद मालशेट्टी व क्रीडा शिक्षक पूजा संताजी व रमेश अलगुडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *