Monday , September 21 2026
Breaking News

मलप्रभा धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Spread the love

 

बेळगाव : मलप्रभा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसाचा विचार करता धरणाची पूर्ण पातळी २०७९.५० फुटांच्या तुलनेत २०७८.१० फुटांवर पोहोचली आहे. मलप्रभा धरणात सध्याची आवक १० हजार क्युसेक आहे. धरणाची पातळी राखण्यासाठी मलप्रभा धरणातून पाणी सोडण्यात वाढ करण्यात येणार आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून आज दिनांक २७-०८-२०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता १०,००० क्युसेक वरून १५,००० क्युसेक पर्यंत विसर्ग वाढवण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने मनःपूर्वक धरण काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *