Saturday , December 20 2025
Breaking News

बेळगाव

कावळेवाडी महात्मा गांधी संस्थेतर्फे कवी संमेलनाचे आयोजन

  बेळगाव : कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे एक जून रोजी सकाळी दहा वाजता बिजगर्णी हायस्कूलमध्ये कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलन उद्घाटन एस. एम. जाधव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून ऍड नामदेव मोरे उपस्थित राहणार आहेत. फोटो पूजन आर. बी. देसाई यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन …

Read More »

चन्नेवाडी शाळेला गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांची भेट

  खानापूर : चन्नेवाडी येथील बऱ्याच वर्षांपासून बंद असलेली शाळा गावकरी व पालक वर्गाच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. बंद असलेल्या शाळेला सुरू करण्यासंदर्भात खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी श्रीमती राजश्री कुडची यांना काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांच्या तर्फे निवेदन देण्यात आले होते, यासाठी मंगळवार दिनांक २८ मे रोजी श्रीमती कुडची यांनी सीआरपी …

Read More »

हलगा-मच्छे बायपास विरोधातील स्थगिती उठवताच जेसीबी दाखल

  बेळगाव : हलगा- मच्छे बायपास प्रकरणी शेतकऱ्यांनी सुमारे दीड दशके चालविलेल्या लढ्याची धार शेतकऱ्यांतील फुटीमुळे कमी होताना दिसत आहे. या प्रकरणी काही शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईचा मोबदला घेतला आहे तसेच बायपास रस्त्याचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण झाले आहे. नुकताच हलगा-मच्छे बायपास जमीन संपादन विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील स्थगिती उठवताच ठेकेदाराने …

Read More »

सामाजिक कार्यकर्ते विश्वास धुराजी यांच्या अमृत महोत्सवानिमित्त….

  बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते आणि समाज सुधारक विश्वासराव नारायणराव धुराजी यांचा अमृत महोत्सव आज बुधवार दि. २९ मे रोजी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर (रिझ टॉकीज) येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजिण्यात आला आहे. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त निवृत्त प्राचार्या विनोदिनी मुरकुटे यांनी घेतलेला आढावा… श्री. विश्वास नारायण धुराजी आणि मी विनोदिनी …

Read More »

बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

  बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारता येणार नाही. बेकायदेशीरपणे देणग्या घेतल्याचे आढळून आल्यास अशा शाळांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला आहे. शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही शाळांमध्ये देणगी (डोनेशन) घेतली जात असल्याच्या तक्रारी …

Read More »

नियोजित वधूच्या आत्महत्येनंतर बेळगाव येथे तरुणाची आत्महत्या

  बेळगाव : ज्या तरुणीसोबत लग्न करायचे होते तिच्या सोबतच लग्न ठरले आणि दोघांनीही सुखी संसाराची स्वप्ने रंगवली असतानाच नियतीने एक वेगळाच डाव मांडला. नियोजित वधूला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच नियोजित वधूने उत्तर प्रदेश येथे आत्महत्या केली आणि विरह सहन न झाल्याने बेळगाव येथे तरुणाने आपले जीवन संपविले. नियोजित वधूला …

Read More »

दहावीत जिल्ह्यात पहिली आलेल्या तनिष्का नावगेकरचा आदर्श को- ऑप. सोसायटीतर्फे सत्कार

  बेळगाव : अनगोळ क्रॉस टिळकवाडी येथील सुप्रसिद्ध आदर्श मल्टीपर्पज को ऑप. सोसायटीचे कायदा सल्लागार ऍड. शंकर नावगेकर यांची कन्या व सेंट मेरीज हायस्कूलची विद्यार्थिनी तनिष्का शंकर नावगेकर हिने नुकत्याच झालेल्या दहावी बोर्डाच्या परिक्षेत जिल्ह्यात पहिली येण्याचा बहुमान मिळविला. याबद्दल तिचा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी चेअरमन एस. एम. …

Read More »

हलगा-मच्छे बायपास रस्त्याची स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली

  बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सदर स्थगिती आज उच्च न्यायालयाने उठवली. न्यायालयाच्या या आदेशामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता विरोधात मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांनी विविध आंदोलनाद्वारे आपला विरोध दर्शविला होता. शेतकरी रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढा देखील देत होते. …

Read More »

बेळगाव महानगरपालिकेवर लोकायुक्त विभागाचा छापा

  बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागावर लोकायुक्तांनी आज छापा टाकला असून लोकायुक्त विभागाचे अधिकारी पुढील तपास करीत आहेत. महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात जन्म-मृत्यू दाखला देण्यास विलंब तसेच सरकारी शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जाते. जन्म- मृत्यू दाखले घेण्यासाठी नागरिक सकाळपासून रांगा लावून उभे असतात. मात्र तांत्रिक अडचणीमुळे लोकांना तासानतास ताटकळत उभे …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे व्याख्यान व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी संस्था मुंबई यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 30 मे रोजी ‘मातृभाषेतून शिक्षणाची गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव मधील तज्ञ शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण हे या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सद्यस्थितीत मराठी …

Read More »