Saturday , March 7 2026
Breaking News

बेळगाव

कोलकाता येथील “त्या” घटनेच्या निषेधार्थ बेळगावातील डॉक्टर रस्त्यावर!

  बेळगाव : कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज बेळगावात पुकारण्यात आलेल्या डॉक्टरांच्या देशव्यापी “24 तास काम बंद” आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयएमए बेळगाव, डेंटल असोसिएशन, आयुष संघटना, अभाविप वगैरे विविध संघटनांनी सकाळी शहरात निषेध मोर्चा काढून निवेदन सादर केले. आजच्या या मोर्चात शेकडो …

Read More »

भोई गल्ली घरफोडी प्रकरणी एकाला अटक

  बेळगाव : बेळगाव शहरात चोरट्यानी उच्छाद मांडला आहे. शहरात असलेल्या भोई गल्लीत गुरुवारी रात्री 1.45 च्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सदर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यावरून पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील तपास करत आहेत. शहरात वाढत …

Read More »

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शेखर तळवार यांच्याकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

  बेळगाव : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सौ. व श्री. लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठान यांच्या वतीने शहापूर नार्वेकर गल्ली सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 45 येथील विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. तसेच खासबाग जोशी मळा येथील मराठी शाळा क्रमांक 15 येथील विद्यार्थ्यांना भागातील शिक्षणप्रेमी, समाजसेवक शेखर तळवार यांच्याकडून …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने रक्तदान शिबिर

  बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभ दिनी महावीर भवन, हिंदवाडी, बेळगाव येथे जितो बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मेघा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेगा रक्तदान शिबिरात बेळगावातील अनेक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. डॉ. महादेव दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती होती. …

Read More »

कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्याकडून निषेध

  बेळगाव : कोलकाता येथे घडलेल्या अमानुष घटनेचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. आज दि. 17 ऑगस्ट रोजी देशभरात होणाऱ्या शांततापूर्ण निदर्शनाला त्यांनी आपला पाठिंबा व्यक्त करून घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहनही डॉ. सरनोबत यांनी …

Read More »

लक्ष्मी रोड भारतनगर शहापूर श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नूतन कार्यकारणी जाहीर

  बेळगाव : नुकतीच श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लक्ष्मी रोड, भारतनगर शहापूर बेळगाव यांची वार्षिक बैठक श्री महागणपती मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीत मागील वर्षाचा जमाखर्च आणि नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. सर्वानुमते अध्यक्षपदी श्री. सचिन शांताराम केळवेकर यांची तर उपाध्यक्षपदी दीपक अशोक सावळेकर यांची निवड झाली. सचिवपदी संदीप …

Read More »

चौथ्या दिवशी शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे सुरूच

  बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेच्या मागणीसाठी अखिल कर्नाटक रयत संघ, अखिल कर्नाटक महिला रयत संघ आणि हरित सेना बेंगळुरू तसेच कर्नाटक राज्य शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात आज चौथ्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरणे धरले. म्हादई – कळसा – भांडुरा प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या पंपसेटसाठी आणलेला …

Read More »

कोलकात्ता घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगावात सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद

  बेळगाव : पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दि. 17 रोजी बेळगावातील सरकारी, खासगी रुग्णालयांची ओपीडी सेवा बंद राहणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे बेळगावचे अध्यक्ष डॉ. रवींद्र अनगोळ यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आठवडा उलटून गेला तरी सरकारने कोणतीही कारवाई …

Read More »

पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद

  बेळगाव : पंचमसाली लिंगायत आरक्षण लढ्यासाठी 15 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली लिंगायत अधिवक्ता महापरिषद घेणार असून बेळगाव अधिवेशनात संघर्षाबाबत निर्णय घेणार असल्याचे श्रीजयमृत्युंजय यांनी सांगितले. बेळगाव येथील जिल्हास्तरीय वकिलांची गुरुवारी रात्री एका खासगी हॉटेलमध्ये बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांपासून आम्ही लिंगायत पोटजातींना ओबीसी आरक्षणासाठी प्रचार …

Read More »

मुजावर आर्केड येथील लिफ्ट तुटली; लोकांची धावपळ

  बेळगाव : नेहरू नगर येथील मुजावर आर्केड येथे लिफ्ट तुटून लोक आत अडकल्याची घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट तुटली आणि त्यात सुमारे सात जण होते. आर्केड कर्मचारी आणि तांत्रिक तज्ज्ञ लिफ्टची दुरुस्ती करत आहेत. काही दिवसांपूर्वीच लिफ्टच्या खराब परिणामामुळे संपूर्ण कारखाना जळून खाक झाला होता, त्यामुळे शहरातील नागरिक हैराण …

Read More »