बेळगाव : टिळकवाडी येथील दोन घरफोडी प्रकरणांचा छडा लावताना टिळकवाडी पोलिसांनी एका चोरट्याला गजाआड केले असून त्याच्याकडील 4 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी चोरट्याचे नांव अनिलकुमार मिसरीलाल राजबार (वय 36, रा. बोदारी, उत्तर प्रदेश) असे आहे. गेल्या कांही दिवसांपूर्वी टिळकवाडी पोलीस ठाण्यामध्ये …
Read More »माळ मारुती पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांना दिली डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस
बेळगाव : रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक देण्यात आली. येथील माळ मारुती पोलीस संघातील सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस जनतेप्रति आपली सेवा बजावीत असतात तसेच पावसाळ्यात अहोरात्र काम करत असतात. त्यांना कुठेही …
Read More »4 लाख रू. किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा जप्त!
बेळगाव : शहरातील सीसीबी पोलिसांनी काल गुरुवारी सदाशिवनगर येथील वीरूपाक्षी रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये धाड टाकून तब्बल 4 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा व इतर साहित्य जप्त केले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हसन साहेब बेपारी (वय 22, रा. उज्वलनगर, बेळगाव) आणि राजेश केशव नायक …
Read More »भारतीय कृषक समाजातर्फे शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने
बेळगाव : भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक आणि यद्येळू कर्नाटका हागू प्रगतीपर संघटनेगळू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरगुंद -नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा 43 वा हुतात्मा दिन कार्यक्रम आज सकाळी गांभीर्याने पार पडला. शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीकेएस तालुका अध्यक्ष संजीव डोंगरगाव हे होते. …
Read More »पालकांची लूट करणाऱ्या शाळांवर कर्नाटक शासनाने उगारला कारवाईचा बडगा!
निपाणी : निपाणीतील अनुदानीत व विनाअनुदानीत शाळेत विद्यार्थ्यांकडून कर्नाटक राज्य सरकारने ठरवून दिलेल्या फी पेक्षा प्रमाणाबाहेर फी ची आकारणी करून कमी रकमेची पावती दिली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर “4 जे आर ह्युमन राईट्स केअर आँरगेनायझेशन” या संघटनेच्यावतीने शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य, शिक्षणाधिकारी बेंगलोर, शिक्षणाधिकारी बेळगाव व क्षेत्र शिक्षणाधिकारी, निपाणी गटशिक्षणाधिकारी …
Read More »पहिल्याच पावसात स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड!
बेळगाव : मागील चार दिवसांपासून शहर परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने मागील एक महिना ओढ देत आता दमदार पावसाला सुरवात झाली आहे. पुनर्वसूच्या तरण्या पावसाने शेतकऱ्यांना सावरले मात्र स्मार्ट सिटीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात अनेक ठिकाणी …
Read More »बेळगावसह परिसरात पावसाचा जोर
बेळगाव : बेळगावसह परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चार दिवसांपासून सततच्या पावसामुळे नदी, नाले प्रवाहित झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे तर रामदुर्ग तालुक्यात किमान पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात खानापूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 41.2 मी.मी. पावसाची नोंद झाली असून सर्वात कमी …
Read More »गोकाक धबधब्यावर जाण्यास निर्बंध; पोलिसांनी जागोजागी बॅरिकेड्स लावले
बेळगाव : गोकाक येथील धबधबा व परिसर पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरले आहे. पावसाळ्यात येथे अक्षरशः जत्रा भरते. येथील मंत्रमुग्ध करणारे नैसर्गिक वातावरण लोकांना खेचून आणत आहे. या जबरदस्त ‘लोकेशन्स’वर फोटो न काढले तरच नवल. धबधब्याच्या कड्याजवळ आणि टोकावर धोकादायक स्थितीत सेल्फी व फोटोसेशन केले जात आहे. मात्र, असे करणे …
Read More »मोहरमच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची खडेबाजार पोलीस स्थानकात बैठक
बेळगाव : इस्लामिक पहिल्या महिन्याची म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून केली जाते. यंदा २९ जुलै रोजी होणाऱ्या मोहरम ताजियाची सुरुवात १९ जुलै पासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मोहरम उत्सवाच्या तयारीसंदर्भात …
Read More »राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ
बेळगाव : मागील चार दिवसापासून शहर व परिसरात संततधार सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे नदी, नाले काही प्रमाणात प्रवाहित झाले आहेत त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावर्षी काहीशी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाणू लागली होती. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta