Friday , November 6 2026
Breaking News

दिवाळी निमित्त जवानांना फराळाचे वाटप

Spread the love

 

बेळगांव : दीपावली सणाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने जवानांना फराळाचे वाटप करण्यात आले. एंजल फाउंडेशन आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील यांच्या सहकार्याने जवानांना वाटपचा कार्यक्रम पार पडला.

त्यांनी या फराळाचे आणि मिठाईचे वाटप कोब्रा कमांडो जवानांना केले. सर्वांची दिवाळी आनंदाने आणि उत्साहाने साजरी व्हावी तसेच जे आपल्या घरापासून दूर राहतात त्यांना आपल्या घराची आठवण येऊ नये.

या करिता एंजल फाउंडेशनच्या वतीने मिठाई आणि फराळ जवानांना वितरित केले आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा मीनाताई बेनके आणि जय जवान जय किसान संघटनेचे गोविंद पाटील, यांच्या सहित सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

जीवित प्रमाणपत्राच्या नावाखाली वृद्धाची २.३७ लाखांची फसवणूक

Spread the love  फेसबुकवरील जाहिरातीला प्रतिसाद देणे पडले महागात; व्हॉट्सॲपवर एपीके फाईल पाठवून सायबर चोरट्यांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *