Monday , September 21 2026
Breaking News

गौरवधनाचे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप

Spread the love

 

बेळगांव : तालुक्यातील दिवाळीनिमित्त कंग्राळी बुद्रुक गावचे ग्राम पंचायत सदस्य यल्लोजीराव पाटील यांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला. सरकारकडून ग्राम पंचायत सदस्यांना देण्यात येणारे गौरवधन स्वतः न वापरता ग्राम पंचायतीमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोनस स्वरूपात वाटप केले.

आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी यल्लोजीराव पाटील यांनी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये जाऊन ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना बोनस तथा मिठाईचे वाटप करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, दादासाहेब बद्दरगडे, भारता पाटील, राजकट्टी, उमेश पाटील सहित ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *