बेळगाव : शहापूर हिंदवाडी लिंगायत स्मशानभूमीमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह उघड्यावर फेकून देण्यात आल्याची घटना आज सकाळी भाजप नेते किरण जाधव यांच्यामुळे उघडकीस आली. याबाबत थोडक्यात माहिती अशी की, आनंदवाडी कुस्ती आखाडा, हिंदू स्पोर्ट्स जलतरण तलावाच्या ठिकाणी भाजप युवा नेते किरण जाधव दररोज पोहणे व चालण्याचा व्यायाम करण्यासाठी जातात. …
Read More »अपघातात जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान निधन
बेळगाव : अपघातात जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान मंगळवार दिनांक 7 रोजी निधन झाले. हलगा येथील प्रवीण अरुण मास्तमर्डी असे या युवकाचे नाव आहे. प्रवीण अरुण मास्तमर्डी (वय 34) या युवकाचा अपघात झाला होता. त्याला अधिक उपचार करता दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच मंगळवार दिनांक 7 रोजी …
Read More »खानापूर म. ए. समितीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू
उमेदवारीसाठी अर्जाचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकिकरण समिती खानापूर तालुकातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकाकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहे. १० फेब्रुवारी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत अर्जासाठी आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या निकालाच्या अंतिम क्षणी सर्वजण म. ए. समितीच्या भगव्या झेंड्याखाली एकत्र राहून येणारी विधानसभा निवडणूक जिंकणे …
Read More »नवहिंद महिला प्रबोधन संघ व प्रियदर्शनी नवहिंद महिला सोसायटी यांच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ उत्साहात
येळ्ळूर : आपली मुले सुसंस्कृत होण्यासाठी त्यांना दररोज अभ्यासाला प्रोत्साहन केले पाहिजे. त्यांच्याकडून घरातील सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजे. स्वच्छतेचे महत्व पटवून देऊन मोठ्यांचा आदर करणे शिकवले पाहिजे, असे विचार हळदीकुंकू -महिला मेळाव्यात निवृत्त शिक्षिका सौ. आशा रतनजी यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधन संघाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी …
Read More »‘टीजेएसबी’ची सेवा आपुलकीची : गाडगीळ
स्थापना दिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव, मान्यवरांकडून गौरवोद्गार बेळगाव : ठाणे जनता सहकारी बँकेच्या बेळगाव शाखेची सेवा आपुलकीची आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध सीए एन. जी. गाडगीळ यांनी काढले. ठाणे जनता सहकारी बँकेच्या 51 बेळगाव शाखेत दि. 6 रोजी स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी गाडगीळ बोलत होते. समाजातील विविध …
Read More »बेळगाव- बागलकोट रस्त्यावर शेतकऱ्यांचा एल्गार!
बेळगाव : नियोजित रिंगरोड रद्द व्हावा यासाठी आज बेळगाव- बागलकोट रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आला. हा रिंगरोड म्हणजे तालुक्यातील शेतकऱ्याला गळफास रोड आहे. जेव्हापासून रिंगरोडचे नियोजन सरकारने घातले आहे, तेव्हापासून आम्ही हा रिंगरोड रद्द व्हावा म्हणून चाबूक मोर्चा काढून शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. चाबूक मोर्चामुळे आपण …
Read More »महापौरपदी शोभा सोमनाचे तर उपमहापौर रेश्मा पाटील
बेळगाव : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज पार पडली असून महापौरपदी शोभा सोमनाचे यांची तर उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. यामुळे बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या महापौर व उपमहापौर पदी मराठी भाषिक महिलांची निवड झाली आहे. काँग्रेसने आज सोमवारी सकाळी महापौर …
Read More »शिवठाणच्या युवकाची आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या दिवसापूर्वीच कौंदलच्या काॅलेजच्या विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी ताजी असतानाच पुन्हा सोमवारी दि. ६ रोजी शिवठाण (ता. खानापूर) येथील ज्ञानेश्वर धाकलू शिरोडकर (वय २३) याने समोरी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शिवठाण येथील युवक सैन्यात भरती होण्यासाठी नंदगड …
Read More »चित्रकला स्पर्धा रद्द करण्यामागे कोणाचा हात याची चौकशी व्हावी : रमाकांत कोंडुसकर
बेळगाव : सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव यांनी आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा रद्द झाल्याबद्दल श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, ही चित्रकला स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता. अनेक नेते राजकीय …
Read More »जखमीच्या मदतीसाठी सरसावले मोरे पिता-पुत्र
बेळगाव : जिथे मदतीची गरज असते तिथे देव स्वतः तरी धावतो किंवा किमान त्याचे दूत तरी पाठवतो हे काही खोटे नाही. अशीच एक घटना काल पुणे- बेंगलोर महामार्गावर घडली. महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या आणि रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एका जखमी व्यक्तीला मदत करण्यासाठी विजय मोरे व त्यांचा मुलगा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta