बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये पतंग उडविण्याबाबत जनजागृतीचा उपक्रम सदाशिव नगर येथे राबविला आहे. सध्या अनेक शाळांना सुट्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी पतंग उडविण्याचा आनंद लुटत आहेत. पण विद्युत खांबाच्या तारांवर, झाडांच्या फांद्यामध्ये पतंग अडकणे तसेच घराच्या छतावर पतंग उडवणे धोकादायक ठरू शकते. नुकतेच अशोकनगरमध्ये एका …
Read More »हर्षा साखर कारखान्यात इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन
सौंदत्ती : सौंदत्ती येथील हर्षा साखर करखान्यात शुक्रवारी 100 केएल क्षमतेच्या इथेनॉल विभागाचे उद्घाटन, बॉयलर प्रदीपन व केन कॅरिअर पूजनाचा कार्यक्रम पार पडला. हुली मठाचे उमेश्वर महास्वामी संबय्यनवरमठ यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा करणार्या 10 शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला. 2021-22 यावर्षी ज्या शेतकर्यांनी ऊस पुरवठा केला आहे …
Read More »गणेश दुध संकलन केंद्राकडून प्रतिलिटर 1.60 पैश्यांची वाढ
संचालक उमेश देसाई यांची माहिती बेळगाव : गणेश दुध संकलन केंद्राच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गाईच्या दुधात प्रतिलीटर 1.60 पैश्यांची वाढ केल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश देसाई यांनी दिली. बेळगांव वेंगुर्ला मार्गावरील बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्रात झालेल्या बैठकीत दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यावेळी …
Read More »सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हा रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022
बेळगाव : सार्वजनिक सार्वजनिक शिक्षण खाते बेळगावी आणि बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शालेय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि निवड चाचणी 2022 चे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी केएलई सोसायटीच्या स्केटिंग रिंक लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे 14 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील …
Read More »भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात
बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने राष्ट्रीय समूहगायन स्पर्धा उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून निवृत्त प्राचार्य व्ही. एन. जोशी उपस्थित होते. व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर, सचिव मालतेश पाटील, खजिनदार रामचंद्र तिगडी, प्रांत सेक्रेटरी स्वाती घोडेकर, प्रांत समूहगायन संयोजक विनायक मोरे उपस्थित होते. प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदेमातरम् …
Read More »सुळेभावी दुहेरी हत्या प्रकरण : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन पोलिस निलंबित
बेळगाव : मारिहाळ पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल बी. एस. बाळगन्नावर आणि पोलिस हवालदार आर. एस. ठालेवाडे यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील सुळेभावी गावात 6 ऑक्टोबरच्या रात्री दोन गटात मारामारी सुरू असल्याची माहिती या दोन्ही पोलिस कर्मचार्यांना दिली असता त्यांनी सदर बाब वरिष्ठ अधिकार्यांच्या निदर्शनास आणून …
Read More »कृतिका जिल्हा स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय टॅलेंट फाउंटन स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. एस. पी. एच. भारतेश कन्नड माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी कृतिका सूरज नायका हिने भाषण स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले असून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शाळेचे प्रशासक ए. ए. सनदी यांनी कृतिकाला मार्गदर्शन केले होते. शाळा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष श्री. …
Read More »सुळेभावी दुहेरी हत्याकांडप्रकरणी 6 जण ताब्यात
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात झालेल्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले. बेळगाव येथील पोलीस आयुक्तालयात प्रसार माध्यमांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या म्हणाले, सुळेभावी गावात काल रात्री 6 ते 7 जणांच्या टोळक्याने दोघांची …
Read More »बेळगाव तालुक्यातील सुळेभावी येथे दोघा युवकांचा पूर्ववैमनस्यातून खून
बेळगाव (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत धोका युवकांचा निर्घृण खून झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात गुरुवारी रात्री घडली असून याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सुळेभावी येतील रणधिर महेश अलियास रामचंद्र मुरारी (वय २६), प्रकाश निगप्पा हुंकार पाटील (वय २४) या दोघा युवकांचा निर्घृण खून करण्यात आला …
Read More »बडकुंद्री येथील जवानाचे श्रीनगरमध्ये हृदयविकाराने निधन
अंकली (प्रतिनिधी) : भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील जवानांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून शिवानंद बाबू शिरगावे (वय 40) असे जवानाचे नाव असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बंधु असा परिवार आहे. सदर जवान जम्मू काश्मीर श्रीनगर येथे 55 आर आर बटालियनमध्ये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta