Monday , September 21 2026
Breaking News

स्वराज्य फर्निचर उद्यमबाग शोरूमचा बक्षीस वितरण

Spread the love

 

बेळगाव : स्वराज्य फर्निचर उद्यमबाग बेळगाव शोरूमच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून रमेश गोरल उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन श्री. रमेश गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे मालक श्री. हिरामणी शिंदे यांनी केला. रमेश गोरल यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली आणि त्यांच्या संस्थेला शुभेच्छा दिल्या.

स्वराज्य फर्निचर संचलित भव्य बक्षीस योजनेची 13 वी सोडती मधून टीव्हीएस एक्सल दुचाकी हे बक्षीस कर्लेकर गल्ली संतीबस्तवाड येथील ज्योतिबा कर्लेकर यांना लागले. तसेच केचापूर गल्ली खानापूर येथील शितल गवळकर, टिळकवाडी येथील अशोक पाटील, कराड येथील मनाली नार्वेकर, निखिल तुपे सुभाष गल्ली अनगोळ, चांगदेव पाटील या पाच सभासदांना उत्तेजनार्थ प्रेशर कुकर हे बक्षीस लागले या सर्व सभासदांचे स्वराज्य ग्रुपतर्फे अभिनंदन करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *