Saturday , June 6 2026
Breaking News

तारांगणतर्फे हळदी कुंकू आणि व्याख्यान

Spread the love

 

बेळगाव : मकर संक्रांती निमित्त बेळगावच्या तारांगणतर्फे हळदीकुंकू व तिळगुळ समारंभ शुक्रवार दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी 4 वाजता सिद्धनाथ जोगेश्वरी सांस्कृतिक भवनामध्ये आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने “महिलांचे वाचन विश्व” या विषयावर बालिका आदर्श माजी मुख्याध्यापिका व ज्येष्ठ लेखिका श्रीमती अशाताई रतनजी यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजना शिगेहल्ली उपस्थित राहणार आहेत. आज पर्यंत वीस पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केलेले आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने गणित विषयाचा अभ्यास करावा म्हणून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. शारदोत्सव महिला सोसायटीच्या त्या माजी अध्यक्षा आहेत. वक्तृत्वावर त्यांचे प्रभुत्व आहे. संजना शिगेहल्ली या मेहंदी ब्युटीशियन आणि रांगोळी अशा विविध कलांमध्ये पारंगत आहेत. अनेक कलेच्या विविध स्पर्धेमध्ये त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे. कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे असे आयोजकांनी कळवले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिक्षणाचा भार यंदाही अतिथी शिक्षकांवरच; कायमस्वरूपी भरतीकडे दुर्लक्ष

Spread the love  बेळगाव जिल्ह्यात १,६१७ अतिथी शिक्षकांची होणार नियुक्ती बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *