बेळगाव : समर्थनगर चौथा क्रॉस येथील रहिवासी विनायक कोकितकर यांच्या घराच्या मागील बाजूस 5.9 फूट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला. कोकितकर यांनी लागलीच सर्पमित्र अक्षय हुंदरे यांना कळविले. अक्षय हुंदरे यांनी शिताफीने साप पकडून मंडोळीच्या डोंगरात सोडून दिले. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सर्पमित्र अक्षय हुंदरे यांनी सांगितले …
Read More »शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन व राष्ट्रीय विषाणूजन्य कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी श्री. चिदंबर अग्निहोत्री आणि प्रमुख पाहुणे म्हणून दीपा गट्टद मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या स्वागतगीताने …
Read More »बेळगाव, खानापूर तालुक्यातील शाळांना सुट्टी..
बेळगाव : जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, पावसाचा जोर वाढल्याने बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना आज शुक्रवार (१५ जुलै) आणि उद्या शनिवार (१६ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Read More »मुडलगी तालुक्यात विजेचा धक्का लागून लाईनमनचा मृत्यू
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील तिगडी गावात ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती करताना लाईनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तिगडी गावात हेस्कॉमचे कर्मचारी निंगाप्पा करीगौडर (38) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निंगाप्पा यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी निषेध व्यक्त केला आहे. कुलगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
Read More »सांबरचे कातडे बाळगल्याप्रकरणी अरण्य खात्याकडून एकाला अटक
बेळगाव : अरण्य खात्याच्या संचारी सीआयडी पथकाने कित्तुर येथे धाड टाकून एका व्यक्तीकडून सांबरचे कातडे जप्त केले. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव मधुकर गोपाळराव देशपांडे (५३) रा. गद्दी गल्ली, कित्तुर असे आहे. ही कारवाई अरण्य खात्याच्या सीआयडी संचारी पथकाच्या प्रमुख पीएसआय रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. मधुकर देशपांडे हे …
Read More »बस पासपासून 50 टक्के विद्यार्थी वंचित
बेळगाव : शैक्षणिक वर्ष चालू होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी अद्याप 50 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळालेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना तिकीट काढून प्रवास करावा लागत आहे. आत्तापर्यंत चाळीस हजार विद्यार्थ्यांना बस पास मिळाला आहे. मात्र अजूनही चाळीस हजारहून अधिक विद्यार्थ्यांना बस पास मिळण्याची आवश्यकता आहे. जुलै अखेरीस बाकीचे …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेलीतर्फे रेहानला मदत
बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव प्राईड सहेली व ऑपरेशन मदत यांच्यावतीने रेहान हलसंगी या आठवीच्या विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य व रेनकोट देण्यात आला. रेहान सरदार हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून त्याची आई सलमा हलसंगी या पेट्रोल पंपावर काम करतात. रेहान होतकरू असून त्याला शैक्षणिक साहित्याची गरज होती. त्यांनी प्राईड सहेलीच्या …
Read More »साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
बेळगाव : गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून साईज्योती सेवा संघाच्या वतीने ठळकवाडी हायस्कूल येथे गुरुजनांचा पाद पूजा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जीवनात मार्ग दाखवण्याचे काम गुरु करतात. गुरुच्या कृपेने आयुष्याचा मार्ग बदलतो. युवा पिढीने गुरूंबद्दलचे आदर राखून त्यांचा आदर्श घ्यावा. गुरूंनी घालून दिलेल्या विचारांचा जीवनात उपयोग करून त्या संधीचे सोने करावे, …
Read More »मंगाईदेवी यात्रा उत्साहात साजरी करण्याचा निर्णय
बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवी यात्रा येत्या 26 जुलै रोजी साजरी करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून यात्रा साजरी करण्यात आली नव्हती मात्र देवीचे धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचे संकट बहुतांश कमी झाले आहे त्यामुळे या वर्षीची यात्रा उत्साहात साजरा करण्याचा …
Read More »संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वडगाव भागात पूरस्थिती!
बेळगाव : बेळगावात पावसाने थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बेळगाव परिसरात मागील 15 दिवसांपासून पावसाची संततधार चालूच आहे. मात्र गुरुवारी सकाळपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. वडगावमधील अन्नपूर्णेश्वरी नगर, केशवनगर, साई कॉलनीचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. अन्नपूर्णेश्वरी नगर सहावा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta