बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात कन्नडीगांच्या संघटनांनी आपला थयथयाट सुरू ठेवला आहे. बुधवारी पुन्हा या संघटनांनी शहरात गोंधळ माजवण्याचा प्रयत्न केला. येथील कित्तूर चन्नम्मा चौकात गोंधळ माजवून संघटनेच्या सदस्यांनी निदर्शने केली. तसेच म. ए. समितीवर बंदी घालण्याची मागणी केली. येत्या दि. 31 डिसेंबर रोजी काही संघटनांनी कर्नाटक बंद …
Read More »प्राचार्या डॉ. शोभा नाईक यांना कबीर पुरस्कार जाहीर
बेळगाव (वार्ता) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा ‘कबीर साहित्य पुरस्कार’ बेळगाव येथील मराठी-कन्नड साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा नाईक यांना जाहीर झाला आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी …
Read More »अॅल्युमिनियमसाठी टेट्रापॅकची होळी
बेळगाव : शीतपेयांच्या टेट्रापॅकमधील अॅल्युमिनियम मिळवण्यासाठी क्लब रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या झाडांखाली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचार्यांकडून कचरा पेटवून देण्याचा गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकू, नका जाळू नका, परिसर स्वच्छ ठेवा हे सर्व नियम फक्त जनतेलाच लागू आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. …
Read More »श्री जोतिबा मूर्ती घेऊन भाविकांचे डोंगराकडे प्रस्थान
बेळगाव (वार्ता) : गेल्या 55 वर्षांपासून प्रथा खंडित होऊ नये याकरिता येथील नार्वेकर गल्लीतील भक्त मंडळाच्या वतीने गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही जोतिबा मूर्तीची गाठ भेट करण्याकरिता वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर डोंगराकडे प्रस्थान करण्यात आले आहे. आज सकाळी मंदिरातील भाविकांच्या वतीने देवाची गाठभेट करण्याकरिता भाविकांनी प्रस्थान केले. चैत्र पौर्णिमेला दरवर्षी …
Read More »नववर्ष स्वागताच्या नावाखाली होणारे गैरप्रकार थांबवा : हिंदू जनजागृती समिती
बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री होणारे गैरप्रकार थांबविण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्ववादी संघटनांनी बेळगाव जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. नववर्ष स्वागताच्या नावाखाली 31 डिसेंबरच्या रात्री युवावर्ग मद्यपान, धूम्रपान अशा अमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. पाश्चात्यांचे अंधानुकरण करत असे गैरप्रकार करण्यात येत आहेत. अनेक …
Read More »कर्नाटक बंदला कन्नड संघटनांचा नकार!
बेळगाव (वार्ता) : राज्यभरात काही दिवसात झालेल्या अनुचित घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला जबाबदार धरून काही कन्नड संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला इतर काही कन्नड संघटनांनीच विरोध केला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समिती सामाजिक शांतता बिघडविण्याचे कृत्य करत आहे, असा आरोप काही कन्नड संघटनांनी तसेच कन्नड आंदोलक वाटाळ नागराज यांच्या नेतृत्वाखाली करत …
Read More »नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई : डीसीपी आमटे
बेळगाव (वार्ता) : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे आपण सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे उल्लंघन करणार्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त (डीसीपी) डॉ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत …
Read More »भिडे गुरुजींवरील वॉरंट न्यायालयाने केले रद्द
बेळगाव (वार्ता) : येळ्ळूर येथील कुस्ती आखाड्याप्रसंगी आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणीच्या खटल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर बजावण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने आज रद्दबातल केले. येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी कुस्ती आखाड्यावेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक -अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यावर सरकारने …
Read More »थकीत वेतनाच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कर्मचार्यांचे आंदोलन
बेळगाव (वार्ता) : उर्वरित वेतन त्वरित द्यावे, यासह विविध मागण्यांचा आग्रह करत बेळगाव जिल्ह्यातील ग्राम पंचायत कर्मचार्यांनी आंदोलन छेडले. ग्राम पंचायत कर्मचार्यांना सरकारी निधीतून वेतन देण्याचा आदेश देण्यात आला आहे. एकूण 8 महिन्यांचे वेतन देण्यात आले असून उर्वरित 4 महिन्यांचे थकीत वेतन यासह 12 ते 15 महिन्यांचे थकीत वेतन अद्याप …
Read More »2023 च्या निवडणुकीत भाजपाची सत्ता आणणे हेच ध्येय : मुख्यमंत्री बोम्माई
हुबळी (वार्ता) : 2023 साली होणार्या निवडणुकीत भाजपाचीच सत्ता आणणे हे माझे ध्येय असून यासाठी आतापासूनच संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. अरुण सिंग यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, यासाठी मी त्यांचा ऋणी आहे, असं विधान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केलंय. हुबळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी उपरोक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta