Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव

मळेकरणी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी

उचगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना, कोविड-19 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली. सध्या या परिसरात विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा वायरस असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने व शासनाने …

Read More »

कोल्हापूरच्या माहिती उपसंचालकपदी डॉ. संभाजी खराट रुजू

प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करा : डॉ. संभाजी खराट कोल्हापूर (जिमाका) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज डॉ. संभाजी खराट यांनी स्विकारला, यावेळी आयोजित बैठकीत त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. …

Read More »

बेळगाव-खानापूर-रामनगर महामार्गावर लवकरच तिन्ही भाषेत फलक

खानापूर (वार्ता) : बेळगाव ते खानापूर आणि अनमोडपर्यंतच्या रस्त्यावर तिन्ही भाषेतील फलक लावण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे आश्वासन धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्रीकांत पोतदार यांनी दिले आहे. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी पोतदार यांची भेट घेऊन खानापूर ते रामनगर रस्त्याचे काम आणि फलक …

Read More »

राष्ट्र आणि धर्माचा आदर राखा : कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजी

बेळगाव : राष्ट्र-धर्म प्रथम हा विचार सदैव लक्षात ठेवा आणि राष्ट्र विचारांनी प्रेरीत मित्रांचे संगठण बनवा, असा विचार सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजींनी मांडला. अंदमानमधील विवेकानंद केंद्रातर्फे चालविल्या जाणार्‍या 1400 विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दि. 23 सप्टेंबर रोजी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.विजयकुमार, उपप्राचार्या अर्चना गुप्ता, पूर्णवेळ …

Read More »

बेळगाव ग्रामीणमधील बॅनर चर्चेत

बेळगाव : निवडणुकीपूर्वी भरमसाठ आश्वासने देऊन नंतर त्याकडे पाठ फिरवणार्‍या नेत्यांची या देशात कमतरता नाही मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारी येऊन मताची याचना करणारे नेते नंतर मात्र मतदारांच्या सर्व मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून त्यांची बोळवण करतात. याचेच प्रत्यंतर आलेल्या मतदारांनी ग्रामीण भागात भागात उपरोधिक बॅनर्स लावून आपला संताप व्यक्त केला. …

Read More »

येळ्ळूर फलक : पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला

बेळगाव : ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटल्याच्या आज गुरुवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी 8 कार्यकर्ते गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आला आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. येळ्ळूर येथील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकावरून उसळलेल्या दंगली संदर्भातील खटला गेल्या 6 वर्षापासून सुरु …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्ट नव्या कार्यकारिणीची निवड

बेळगाव : श्री घुमटमाळ मारुती मंदिर पब्लिक ट्रस्ट, हिंदवाडीच्या अध्यक्षपदी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर श्री. चंद्रकांत बांडगी यांची आगामी वर्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मावळते अध्यक्ष अनंत लाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी कुलदीप भेकणे यांची तर चिटणीसपदी प्रकाश माहेश्वरी यांची निवड झाली आहे. …

Read More »

पत्रकारांवरील हल्ले : जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : राज्यात पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेतर्फे आज बुधवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर करण्यात आले. बेळगावातील उर्दू-हिंदी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जकाती यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर केले गेले. जिल्हाधिकार्‍यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात बोलताना अध्यक्ष इक्बाल जकाती …

Read More »

रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे सरदार्स हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती पुस्तकांचे वाटप

बेळगाव (वार्ता) : येथील सरकारी सरदार्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम यांच्यावतीने राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची पुस्तके वाटप करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन. एम. मदनभावी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, रो. सी. एस. व्ही. आचार्य, रो. उमेश रामगुरवाडी, रो. प्रसाद कट्टी …

Read More »

पाणी पुरवठा खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

बेळगाव : अथणी ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल्य खात्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि कार्यालय व्यवस्थापक अशा दोघा जणांना लाच स्वीकारताना भ्रष्टाचार निर्मूलन पथकाने (एसीबी) सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. अथणी ग्रामीणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेंद्र इंद्रप्पा वर्णाकर आणि कार्यालय व्यवस्थापक दीपक कृष्णाजी कुलकर्णी अशी एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या अधिकार्‍यांची नांवे आहेत. एका …

Read More »