Wednesday , March 4 2026
Breaking News

बेळगाव

‘श्री’ विसर्जन शक्यतो लवकर करा : महामंडळाचे आवाहन

बेळगाव : राज्यभरात अद्यापही नाईट कर्फ्यू जारी असल्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारी श्रीगणेश विसर्जना दिवशी रात्री 9 च्या आत शक्यतो दिवसभरात सायंकाळपर्यंत महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केलेल्या आपापल्या भागातील नजीकच्या तलाव अथवा विहिरीच्या ठिकाणी श्री मूर्तींचे शांततेत विसर्जन करून सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाने केले आहे. …

Read More »

मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आता ‘क्यू आर कोड’

बेंगळुरू : कर्नाटक शिक्षण खात्याने कन्नड व इंग्रजी माध्यमांप्रमाणे आता मराठी माध्यमांच्या आठवी ते दहावी पर्यंतच्या पुस्तकांमध्ये प्रत्येक पाठावर ‘क्यू आर कोड’ उपलब्ध करून दिला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रत्येक पाठाचा अभ्यास करताना संबंधित पाठाचा व्हिडिओ पाहता येणार आहे. कर्नाटक शिक्षण खात्याने यापूर्वी कन्नड व इंग्रजी माध्यमांमध्ये क्यू आर कोडचा …

Read More »

बेळगावात पाणी पुरवठा कर्मचार्‍यांचा संप मागे

बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या संपकरी कामगारांनी शुक्रवारी आपला संप मागे घेतला. आ. अनिल बेनके यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला. बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या कामगारांना गेल्या 15 दिवसांपासून सणासुदीच्या काळातही वेतन मिळालेले नाही. ते तातडीने द्यावे तसेच पालिकेतर्फे वेतन अदा …

Read More »

देशात लसीकरणाचा विक्रम; बेळगावात उत्तम प्रतिसाद

दिवसभरात दिले दोन कोटी डोस नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट अद्यापही आहे. सध्या परिस्थिती हाताबाहेर नसली तरीही कोरोनाचं संकट केंव्हाही रौद्ररुप धारण करु शकतं. या संकटाशी दोन हात करण्यासाठी सध्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. गेल्या 16 जानेवारीपासून लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. आतापर्यंत लसीकरणाच्या या कार्यक्रमाअंतर्गत 77 कोटी …

Read More »

वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आ. अंजली निंबाळकरांनी उठवला आवाज!

बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या …

Read More »

दोघा सराईत चोरट्यांना अटक : 3.10 लाखाचा ऐवज जप्त

बेळगाव : माळमारुती पोलिसांनी दोघा सराईत चोरट्यांच्या जोडगोळीला अटक करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने, किंमती साहित्य, मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या पथकाने शहर परिसरात चोर्‍या करणार्‍या …

Read More »

पोलीस उपायुक्तांनी केला विविध भागांचा पाहणी दौरा

बेळगाव : कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल शहरात पाहणी दौरा करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व स्थानिक पंचांशी संवाद साधला. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी काल बुधवारी सायंकाळी शहरातील चव्हाट गल्ली, खडक …

Read More »

फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून सर्कस कलाकारांना मदतीचा हात!

बेळगाव : लॉकडाऊन आणि कोरोना प्रादुर्भावासंदर्भातील निर्बंधांमुळे बिकट परिस्थिती ओढवली असतानाही पारंपारिक सर्कस कलेचा वारसा जोपासणार्‍या निपाणी येथील सुपरस्टार सर्कसच्या कलाकारांसाठी बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलतर्फे नुकतीच सुमारे 15 हजार रुपयांच्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. निपाणीतील सुपरस्टार सर्कसमधील कलाकारांच्या उपेक्षित जगण्याची व्यथा स्थानिक वृत्तपत्र माध्यमातून निदर्शनास येताच बेळगाव फेसबुक फ्रेंड्स …

Read More »

उद्यापासून भाजपचे विशेष सेवा अभियान

बेळगाव : येत्या दि. 17 सप्टेंबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने भाजपतर्फे विशेष सेवा आणि समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य प्रवक्ते अ‍ॅड. एम. बी. जिरली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान होणार आहे. यामध्ये …

Read More »

आयएमएतर्फे उद्या भव्य कोरोना लसीकरण शिबिर

बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव जिल्हा शाखा, जिल्हा प्रशासन, जिल्हा वैद्यकीय खाते तसेच तालुका वैद्यकीय खात्यातर्फे शहर परिसरातील विविध 18 खासगी रुग्णालयांत शुक्रवारी दि. 17 रोजी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेचे सचिव व कॉलेज रोड येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटरचे संचालक …

Read More »