रायगड : ‘कुठल्याही प्रकारचे राजकारण येऊ देऊ नका, आपलं कोणतंही स्वार्थ नाही. यापुढे शिवरायांचा अवमान करूनच दाखवावा, काय होईल त्यावेळेस आपआपल्या परीने पाहून घेऊ. अवमान करणाऱ्यांना वेळ दाखवण्याची वेळ आली आहे. मन आज व्यथित झालं आहे. दुखीत झालं आहे. आज व्यथित होऊन चालणार नाही. पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाऊन बांधणी …
Read More »कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोडलेल्या पाण्यात जलसमाधी घ्या; संजय राऊत संतापले
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी शिंदे गटावर आणि सरकारवर जोरदार हल्ला केला. संजय राऊत म्हणाले की, कुठल्याही गावात जा गद्दारांना खोकेवाले आले, असे म्हटले जात आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदार-खासदारांचं काहीच भवितव्य दिसत नाही. वैजापूरच्या आमदाराला फक्त चपला मारायच्या बाकी होत्या, असे …
Read More »बाबासाहेब पुरंदरेंच्या विकृत आणि अनैतिहासिक मांडणीवर नेहमीच टीका केली, गौरवीकरण नाही; राज ठाकरेंच्या भेटीनंतर डाॅ. जयसिंगराव पवारांचा खुलासा
कोल्हापूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आता स्वतः जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरेंच्या भेटीविषयी निवेदन जारी करत मोठा खुलासा केला आहे. जयसिंगराव पवार म्हणाले, “राज …
Read More »चंदगड तालुक्याच्या विकासासाठी राज ठाकरे यांनी लक्ष घालावे
चंदगड : चंदगड तालुक्याच्या विकासासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे जिल्हा उपप्रमुख पिनु पाटील यांनी नुकतेच राज ठाकरे यांना दिले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेला कर्नाटक- गोवा राज्याच्या सीमेलगत असलेला चंदगड तालुका पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून …
Read More »नूल येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेवर शिवसेनेची धडक
गडहिंग्लज : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नूल या शाखेत ग्राहकांना सुविधा न देता अरे तुरे भाषा कर्मचारी वापरत असल्याची काही दिवसापासून चर्चा सुरू होती. दोन दिवसापूर्वी काही शेतकऱ्यांनी शाखेमध्ये शेतीच्या कामासाठी बँक खाते 10 लोकांनी खाते काढण्यासाठी अर्ज सादर केले. पण कर्मचाऱ्यांनी खाते ओपन करून पासबुक न देता आज- …
Read More »प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदुषण प्रश्न कायमस्वरुपी सोडवा : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (जिमाका): प्रभावी उपाययोजना राबवून पंचगंगा प्रदूषणाचा गंभीर प्रश्न कायमस्वरुपी सोडवा, अशा सूचना देवून यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील …
Read More »ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन; मराठी साहित्य विश्वात शोककळा
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं …
Read More »शिवसेनेत कर्नाटकची नाकेबंदी करण्याची ताकद : विनायक राऊतांचं विधान!
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरून विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका सुरू आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना (ठाकरे गट) नेते खासदार …
Read More »…तर कर्नाटकमध्ये जायला मागेपुढे पाहणार नाही!
जत तालुक्यातील आता उमराणी ग्रामस्थांचा जाहीर इशारा, तिकोंडीत बोम्मईंचा फलक सांगली : सहा महिन्यांच्या आत पाण्याचा प्रश्नाचे मार्गी लावला नाही, तर कर्नाटकात सामील होण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा जाहीर इशारा महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या उमराणी ग्रामस्थांनी दिला आहे. कर्नाटकचे मुख्मंत्री बसवराज बोम्मई यांचा अभिनंदन ठरावही ग्रामस्थ …
Read More »सीमावादाचा फटका कानडी विठ्ठलभक्तांना; रात्रीतून चोरून प्रवास करत भाविक पोहोचताहेत पंढरीत
पंढरपूर : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून होत असणाऱ्या बेताल वक्तव्यामुळे सध्या दोन्ही राज्यातील वातावरण अतिशय कलुषित झाले आहे. याचा फटका कानडी विठ्ठल भक्तांना बसू लागला आहे. सध्या दोन्ही राज्यातील वातावरण बिघडत चालल्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. अशातच महाराष्ट्राच्या बसेस सीमेवर जाऊन प्रवासी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta