Sunday , September 20 2026
Breaking News

विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात शिवसैनिक आक्रमक; पोलिसांनी कोल्हापुरातच अडवले

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. शिवसैनिकांनी शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून विशाळगडाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापुरातच पोलिसांनी शिवसैनिकांना अडवले. कोल्हापूर पोलिसांनी राज्य सरकारच्या दबावामुळे आम्हाला विशाळगडावर सोडलं नाही. मात्र, गनिमी काव्याने आम्ही विशाळगडाकडे जाणार असल्याचा इशारा कोल्हापुरातील शिवसैनिकांनी बोलून दाखवला.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, हे अतिक्रमण हटवण्यासाठी जिल्हा प्रशासन कमी पडत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीपूर्वी अतिक्रमण काढून टाकले जाईल, असं आश्वासन दिलं आहे. मात्र, गडावरील अतिक्रमण हटवण्यास अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिकांनी अवजारे घेऊन विशाळगडाकडे जाण्याचा प्रयत्न केला.

About Belgaum Varta

Check Also

ग्रामीण भागातील महिला कारागिरांच्या हस्तनिर्मित वस्तूंना हक्काचे व्यासपीठ

Spread the love  “कलापुरीचे कलादालन” करवीरवासीयांच्या सेवेत रुजू कोल्हापूर : सौ. अपर्णा चव्हाण व श्री. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *