Saturday , April 26 2025
Breaking News

विधान भवनावर धडकणार लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’

Spread the love

 

नागपूर : महाराष्ट्रातील हिंदू तरुणी श्रद्धा वालकरचे 35 तुकडे केल्यानंतर ते प्रकरण शांत होत नाही, तोच झारखंड राज्यातील रबिका या हिंदू तरुणीचे 50 तुकडे केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अशा एक-दोन घटना नसून असंख्य घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. ही वेळ आपल्या मुलींवर येऊ नये. तसेच दुसरीकडे देशात छळ, बळ, कपट यांद्वारे हिंदूंचे वाढते धर्मांतर नव्या राष्ट्रांतराला जन्म देऊ शकते. हे राष्ट्रघातकी ‘धर्मांतर’ आणि ‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी नागपूर येथे हिंदु जनजागृती समिती, समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि समाज यांच्या वतीने 21 डिसेंबर या दिवशी नागपूर विधान भवनावर राज्यस्तरीय ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्च्यात विदर्भासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून संत, धर्माचार्य, संप्रदायाचे प्रमुख, हिंदू संघटना आणि विविध ज्ञाती समाज सहभागी होणार आहेत, अशी माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

या संदर्भात नागपूर येथील ‘अखिल भारतीय माहेश्वरी समाज भवन’ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित दुसर्‍या बैठकीला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, रजपूत करणी सेना, राष्ट्रीय युवा गठबंधन, पुरोहित संघटना, सनातन संस्था, बजरंग दल आदी विविध संघटना, तसेच अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी संपूर्ण विदर्भात मोर्चाविषयी चालू असलेले संपर्क अन् जागृती अभियान यांचा आढावा मांडण्यात आला. तसेच या मोर्च्याद्वारे हिंदूंचे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येकाने ‘अभी नही, तो कभी नही’ हा निर्धार करून अधिकाधिक हिंदूंपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला आहे. अशा बैठका प्रत्येक संघटना घेत आहे.

आज नागपूरमधील काही प्रमुख गर्दीच्या ठिकाणी ‘‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्या विरोधीतील मोर्च्यात मी सहभागी होत आहे, तुम्हीही सहभागी व्हा !’ असे आवाहन करणारे ‘सेल्फी पॉईन्ट’ उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तरुण-तरुणी येऊन स्वत:चे सेल्फी, तसेच व्हिडिओ रेकॉर्ड करून स्वत:च्या व्हॉटसॲप, ट्वीटर, फेसबुक आदी सामाजिक माध्यमांमध्ये पोस्ट करत होते. या अभिनव उपक्रमाद्वारे हजारो लोकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. तसेच ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा’ करण्यात यावा या मागणीसाठी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. शेकडो रिक्शावर मोठी पत्रके चिटकवणे, हजारो हस्तपत्रकांचे वितरण करणे, प्लेक्स फलक लावणे, होर्डिंग्ज लावणे, प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी ‘व्हिडिओ क्लिप’द्वारे सोशल मीडियावरून आवाहन करणे, विदर्भातील सर्व जिल्ह्यात धरणे आंदोलनाच्या माध्यमांतून जागृती करणे, प्रशासनाला निवेदने देणे, तसेच विदर्भातील माहेश्वरी, जैन, ब्राह्मण, खाटिक आदि विविध समाजाच्या वा संघटनांच्या प्रमुखांना भेटून त्या त्या समाजात जागृती केली जात आहे. तर ठिकठिकाणच्या धार्मिक कार्यक्रमांत जाऊन सर्वांना मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी 9373536370 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासंदर्भात छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली पुरातत्व विभागाचे महासंचालक यदुबीर सिंह रावत यांची भेट

Spread the love  कोल्हापूर : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर असलेली एका काल्पनिक कुत्र्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *