तेऊरवाडी (एस. के. पाटील) : मुगळी (ता. चंदगड) येथे दोन ते तिन दिवसापूर्वी दलितवस्तीमध्ये केलेला नवीन डांबरी रस्ता खचला आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाला जबाबदार कंत्रादारांकडून हे काम अर्धवट झाले असून त्यावर ग्रामपंचायतीने योग्य ती कारवाई करून रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्या निधीतून जवळपास ७ लाखाचा विकास निधी खर्च करून दोनच दिवसापूर्वी मुगळी (ता. चंदगड) येथील रवळनाथ मंदिर ते दलीत वस्तीचा रस्ता करण्यात आला आहे. मात्र, काम इतके निकृष्ट दर्जाचे झाले आहे की, त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत.तसेच रस्ता जगोजागी खचला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड नाराज झाले आहेत. कॉन्ट्रॅक्टरने काम अर्धवट केल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने त्यात तात्काळ लक्ष घालून दुरुस्ती करून घ्यावी अन्यथा कंत्रादारावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
