तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री (ता.चंदगड) येथील विलास बाळाराम पाटील यांची कोकण विभागाच्या आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी कार्यरत आहेत. विलास पाटील यांच्या विभागीय आयुक्त म्हणून चंदगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.
कालकुंद्री येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवासी विद्यानिकेतनमध्ये झाले. दहावी आणि बारावीच्या शालांत परीक्षेत ते पुणे बोर्डात मेरिट लिस्टमध्ये आले होते. शिवाजी विद्यापीठात बीएच्या राज्यशास्त्र शाखेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.
Belgaum Varta Belgaum Varta