चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने चंदगड विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळा उपक्रम राबविला आहे.
चंदगडवासीयांची होणारी गैरसोय थांबावी व नेहमी उपलब्ध व्हावी यांसाठी सर्व सोयी नियुक्त अशी अत्याधुनिक अम्ब्युलन्स 24×7 तास रुग्णवाहिका लोकांच्या सेवेसाठी प्रभाकर दादा खांडेकर फौंडेशनमार्फत शिनोळी येथे उपलब्ध केली आहे. सदर रुग्णवाहिका लोकार्पण शुभारंभ शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर दादा खांडेकर यांच्या शुभहस्ते व साई क्लिनिकचे सर्वेसर्वा डाॅ. उमेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी उपसरपंच बंडु गुडेकर, ह.भ.प.नारायण पाटील, विनोद पाटील, ग्राम पंचायत सदस्या वंदना पाटील, तानाजी खांडेकर, परशराम मनोळकर, अजित खांडेकर, नारायण पाटील, मोनेश्री चव्हाण, आनंद जाधव, कृष्णा पाटील, बाळकृष्ण तरवाळ, शिवाजी पाटील, राहून मेणसे, बाळासाहेब खांडेकर, केतन कार्तिक आदी मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta