चंदगड : चंदगड तालुक्याच्या विकासासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मनसे जिल्हा उपप्रमुख पिनु पाटील यांनी नुकतेच राज ठाकरे यांना दिले.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील दक्षिणेला कर्नाटक- गोवा राज्याच्या सीमेलगत असलेला चंदगड तालुका पर्यटन स्थळ म्हणून घोषित करून तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शासनाचे लक्ष वेधावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
चंदगड तालुका हा नेहमीच विकासापासून वंचित राहिला आहे. प्रशासनाचे या तालुक्याकडे दुर्लक्ष झाले आहे. चंदगड तालुक्याला निसर्गाची दैवी देणगी आहे. या भागात अनेक लहानमोठे किल्ले व धबधबे आहेत. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात सुट्टीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आसपासच्या परिसरातून अनेक पर्यटक या भागात येतात. शासनाने चंदगड तालुक्याला पर्याय क्षेत्र म्हणून जाहीर करून योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या तर या भागतील तरुणांना रोजगार मिळेल. या भागातील बहुसंख्य तरुण केटरिंग व्यवसायाच्या निमित्ताने पुणे,मुंबई, गोवा येथे आहेत. त्या तरुणांना आपल्याच तालुक्यात व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे अश्या आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.