
शिनोळी : ज्ञानदीप शिक्षण मंडळ संचलित राजर्षी शाहू विद्यालय शिनोळी बु. येथे शिवशाही संघटनेच्या वतीने मोफत गणवेश वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ८वीच्या ३४ आणि ९वीच्या ४ विद्यार्थ्यांना गणवेश वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी होते .
कार्यक्रमाच्या सुरवातीला मुलींच्या स्वागत गीताने करण्यात आली. यावेळी दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते व सरस्वती प्रतिमा पूजन नितीन पाटील यांनी केले.
शिवशाही संघटनेचे प्रमुख माननीय नितीन नारायण पाटील (माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य) यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीने शोभा मिळाली. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रघुनाथ गुडेकर (माजी उपसरपंच), विनोद परशराम पाटील (चेअरमन, विकास सेवा सोसायटी), मारुती अतिवाडकर, प्रभाकर अतिवाडकर, विष्णू तानगावडे, बाबू देसाई, लक्ष्मण देवण, शिवाजी तानगावडे, रामलिंग मेणसे (संचालक, विकास सेवा सोसायटी), विजय तानगावडे, मोनेश्री चव्हाण, भरमाणा पाटील, यल्लुप्पा गुडेकर, दत्तु गावडे, परशराम भरमाणा पाटील, मारूती नारायण पाटील आणि लक्ष्मण बोकमूरकर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून व्यासपीठावर संस्थेचे सचिव बी.डी. तुडयेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव शिंदे, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विनोद परशराम पाटील आणि व्हा. चेअरमन लक्ष्मण रामू गुडेकर उपस्थित होते.
नितिन पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, “शिवशाही संघटना केवळ शैक्षणिकच नाही, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आमचा उद्देश समाजात एक आदर्श निर्माण करण्याचाही आहे. भविष्यातही आम्ही शाळेच्या आणि गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहू.” “आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन काम करणे हाच आमचा उद्देश आहे,” असेही त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव सुर्यवंशी यांनी नितिन पाटील शाळेचे आधारस्तंभ असून त्यांच्या दातृत्वाची विशेष प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
तसेच दयानंद रेडेकर, सुजाता सुमित डागेकर, बबिता सागर तानगावडे, मनिषा बोकमूरकर, वर्षा वैजनाथ मेणसे, सुमन मोनाप्पा पाटील, मनिषा मनोहर देसाई, लक्ष्मण देवण, अंकुश पाटील, शटुप्पा पाटील यासह पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एन. टी. भाटे यांनी केले, सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. बी. कदम यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta