चंदगड (वार्ता) : तिलारीनगर ता. चंदगड येथील श्री माऊली विद्यालयात 1996-97मध्ये दहावीत शिकणार्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. यावेळी 25 वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक डी. एस. सातार्डेकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी दीपप्रज्वलन उपस्थित शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले.
एस. आर. पाटील, श्रीमती भातकांडे मॅडम, श्री. पवार यांनी हा गुरु शिष्य स्नेहाचा सोहळा असाच पुढे सुरू राहावा व ऋणानुबंध कायम राहावेत असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित शिक्षकांचा सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून करण्यात आला. विद्यार्थ्यांचाही त्यांच्या कुटुंबासह पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यामार्फत वही, पेन, पुस्तके, सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले, शाळेलाही भेटवस्तू देण्यात आली. त्यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमासाठी संदीप पाटील या विद्यार्थ्याने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करू सर्वांना एकत्रित आणले. या कार्यक्रमासाठी बेंगलोर, मुंबई, पुणे, कोल्हापूर व स्थानिक पातळीवरून सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
अनंत गावडे-पाटीलसह अन्य विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष तुषार गावडे जंगमहट्टी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. बेरड, माजी मुख्याध्यापक एस. आर. पाटील, आर. जी. पाटील, सेवानिवृत्त शिक्षक श्री. डोळेकर, श्री. सोनार, श्री.शहापूरकर, श्री. वाडेकर, श्री. काटकर, पी. बी. जाधव, एम. बी. जाधव आदीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक अशोक दळवी, सूत्रसंचालन प्रा. ग. गो. प्रधान यांनी तर आभार प्रा. डी. एम. पाटील यांनी मानले.
Check Also
चंदगडमध्ये डॉ. नंदा बाभूळकर यांच्या उमेदवारीला मविआतील नेत्यांचा विरोध
Spread the love गडहिंग्लज : चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असताना …