
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुका चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची नुतन कार्यकारिणी नुकतीच संघटनेच्या बैठकीत जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी अर्जुन पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष -सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, सचिव -दत्तात्रय पाटील, खजिनदार – सागर नेसरकर, संचालक -शामराव बेनके, शेखर पाटील, विजय कोकितकर, शंकर भेकणे, मनोज हळदणकर, विलास देसाई, प्रकाश जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी नुतन अध्यक्ष अर्जुन पाटील यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला.
Belgaum Varta Belgaum Varta