
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : केंद्रातील भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे त्रस्त जनतेचा आक्रोश व जनतेच्या मनातील भावना विविध माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी चंदगड तालूका काँग्रेसच्या वतीने चंदगड तहसिल कार्यालयापर्यंत जुमला (भोंगा) आंदोलन करून तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन दिले.
प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा अध्यक्ष व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आदेशानुसार कोल्हापूर व राज्यभर महागाई विरोधात कॉग्रेस पक्षाची भोंगा आंदोलने होतं आहेत. आज दिनांक 27 एप्रिल रोजी चंदगड तालुका काँग्रेस कमिटी यांच्यावतीने चंदगड येथील संभाजी चौक येथे हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाई विरोधात भोंगा आंदोलन करत केंद्र सरकारविरोधी घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसिलदार विनोद सणावरे याना निवेदन देवून आंदोलन संपविण्यात आले. यावेळी संभाजीराव देसाई अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी चंदगड, विलास पाटील, तात्यासाहेब देसाई, राजेंद्र परीट, अशोक दाणी, कलिम मदार, प्रसाद वाडकर, आनंद
हळदणकर, शिवाजी सुभेदार, विष्णू गावडे, दिलीप चंदगडकर, किसन पाटील, जयवंत गावडे, अभि गुरबे आदिनी आंदोलनात सहभाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta