तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालुक्याचे भाग्यविधाते, हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय नरसिंगराव गुरुनाथ पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त आज म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे रक्तदान शिबिर आयोजित करुन साजरी करण्यात आली.या रक्तदान शिबिरमध्ये पंचक्रोशितिल एकूण 70 तरुणांनी रक्तदान केले. तसेच स्व. नरसिंगराव पाटील यांचा म्हाळेवाडी येथील सहकार संकूलनामध्ये अर्धपुतळ्याचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले, सहकार टिकविण्यासाठी कै. आमदार नरसिंगराव पाटील यानी जीवाचे रान केले. साहेबांचे कार्य आणि त्यांची शिदोरी व आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी सुद्धा आमदार झालो. चंदगड चा कायापालट करण्याचे स्वप्न उराशी बाळगून कार्य करणाऱ्या साहेबांनी अखेरचा श्वासही मंत्रालयात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतला.
यावेळी म्हाळेवाडी गावचे सरपंच सी. ए. पाटील, कानडेवाडीचे एम. के. देसाई, अभिषेक शिंपी, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अभयबाबा देसाई, तानाजी गडकरी, उद्योजक बाबूराव पाटील, एस. एन. देसाई (माजी सरपंच तळेवाडी), दयानंद भादवणकर, बाळासाहेब कानडीकर, संदिप शिंदे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच तरुण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.